

devendra fadnavis eknath shinde ajit pawar
esakal
ठाणे: काँग्रेसच्या नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ देऊनही अंबरनाथ नगर परिषदेत सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न शिवसेनेने (एकनाथ शिंदे) धुळीस मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे चार आणि एक अपक्ष, अशी नवी मोट बांधत शिवसेनेने ‘शिवसेना अंबरनाथ विकास महायुती स्थापन करीत’ ३२ नगरसेवकांच्या संख्याबळावर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसची साथ घेऊन टीकेची धनी बनलेल्या भाजपला आपलाच डाव महागात पडला आहे. तर, सत्तेसाठी पक्ष सोडणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांचे हातही रिकामे राहिले आहेत.