

Fake Notes On Road In Ambernath
ESakal
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व परिसरातील रस्त्यांवर शुक्रवारी (ता. २६) अचानक ‘नोटांचा पाऊस’ पडल्याचे पाहायला मिळाले. पालेगाव रोडपासून ते हुतात्मा चौक आणि उड्डाणपुलापर्यंत ५० रुपयांच्या नोटांचा खच पडल्याने नागरिकांची मोठी झुंबड उडाली; मात्र या नोटा जवळ जाऊन पाहिल्यावर त्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला; मात्र या खोट्या नोटा उचलण्यासाठी रस्त्यात वाहने थांबवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.