
अंबरनाथचे शिवसेना (शिंदे गट)आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून २ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. शहरातील शिवसेनेच्याच २ जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय. मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.