Ambernath Crime Incident of forced labor
अंबरनाथ : शहरात औद्योगिक प्रगतीचे दावे केले जात असतानाच, अंबरनाथ पश्चिमेकडील लादीनाका परिसरात वेठबिगारीचे संतापजनक प्रकरण उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील मजुरांना डांबून ठेवून, त्यांच्याकडून अमानुषपणे काम करून घेत त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या शक्ती फूड इंडस्ट्रीजच्या दोन मालकांविरुद्ध अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फिर्यादीसह १० कामगारांची सुटका केली आहे.