Ambernath Water Crisis: आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा संघर्ष अटळ! अंबरनाथचे शिवसेना शहर प्रमुख वाळेकर यांचा इशारा

Ambernath shivsena: अंबरनाथ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रासले आहेत.
ambernath water shortage
ambernath water shortageesakal
Updated on

अंबरनाथ, ता. 6 - अंबरनाथ शहरांमध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून वारंवार वीज पुरवठा देखील खंडित होत आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येवर आठ दिवसात तोडगा काढा अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा थेट इशारा अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे. याप्रश्नी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत आठ दिवसांची मुदत मागितली आहे. आठ दिवसांत तोडगा निघाला नाही तर या दोन्ही विभागांविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं अरविंद वाळेकर यांनी सांगितलं आहे.

ambernath water shortage
Ambernath News: अंबरनाथच्या काही भागात वीजपुरवठा खंडीत  

अंबरनाथ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रासले आहेत. याबाबत शिवसेनेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला विचारलं असता त्यांनी महावितरणकडे बोट दाखवत वीजपुरवठा नियमित नसल्यामुळेच पाणीपुरवठ्याला फटका बसत असल्याचं कारण दिलं होतं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरण या दोन्ही विभागांच्या भोंगळ कारभाराचा फटका जनतेला बसत असून विजेची समस्या तसेच पाण्याची समस्या या वारंवार शहरात उद्भवत आहेत. पावसाळा सुरू होऊन देखील पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकात आहेत. त्यामुळे शिवसेना शहरप्रमुख वाळेकर यांनी या दोन्ही विभागांना आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली असून त्यात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यावर आठ दिवसात ही समस्या मार्गी न लागल्यास संघर्ष अटळ असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.