

“Body Still Missing: Mumbai Sailor Killed in Oman Attack, Father Awaits Closure”
esakal
Mumbai Sailor Killed in Oman Attack: ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील २५ वर्षीय खलाशी दीक्षित सोळंकी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा हा परिणाम असल्याचे दिसून येत आहे. ‘एमकेडी व्योम’ या तेलवाहक जहाजावर काम करत असलेल्या दीक्षित यांना इंजिन रूममध्ये आग लागल्याने जीव गमवावा लागला. या घटनेने आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर कार्यरत भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे.