कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भाजपचं राज्यभर 'महाराष्ट्र बचाओ आंदोलन'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भाजपचं राज्यभर 'महाराष्ट्र बचाओ आंदोलन'

मुंबई- महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यातच मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनं आजपासून राज्यभरात महाराष्ट्र बचाओ आंदोलन करत आहेत. राज्यातली आणि मुंबईतील कोरोनाची समस्या पाहता दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यावरुनच राज्य सरकार निष्क्रिय झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. राज्यातल्या महाविकास आघाडीला कोरोनाबाबत जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं भाजपनं सांगितलं आहे. कोरोना व्हायरसला राज्यात रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूनं हे आंदोलन पुकारलं असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी दीर्घकाळ चर्चा केली. त्यावेळी या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन देणार 

महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी आज भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मुख्यमंत्री तसंच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन देणारेत. तर शुक्रवारी लाखो कार्यकर्ते, पदाधिकारी आपापल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील त्या फलकांवर सरकारविरोधात घोषणा लिहिलेल्या असतील. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही हातावर पोट असलेल्यांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

फडणवीस म्हणाले, सर्व काही भगवान भरोसे

या बैठकीत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाची समस्या गंभीर झाली असून परिस्तिथी हाताबाहेर गेली आहे. जबाबदारी घेऊन कोण निर्णय घेत आहे, असा प्रश्न पडतो. राज्यात सर्व काही भगवान भरोसे असल्यासारखी स्थिती आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळून उपचार मिळणे अवघड झाले आहे. 

पुढे ते म्हणाले की, गावोगावी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.  गरीबांचे, मजूरांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. कोणत्याही प्रश्नावर राज्य सरकार ठाम भूमिका घेत नाही. केंद्र सरकारने चिंता करायची आणि राज्याने काहीच करायचे नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

सत्ताधारी आघाडीकडून केवळ राजकारण करणे, प्रसिद्धी मिळवणं आणि सोशल मीडियावरून आभासी स्थिती निर्माण करणं चालू आहे. वास्तविक स्थिती ध्यानात घेऊन जनतेचे दुःख मांडावे अशी लोकांची अपेक्षा असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. राजकारण होऊ नये याचा अर्थ जनतेची दुःखे मांडायची नाहीत असे होत नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड ओढून सामान्यांची दुःखे मांडण्याची आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची ही वेळ असल्याचं फडणवीस म्हणालेत.

amid corona bjp maharashtra to start agitation called maharashtra bachao

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com