मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपाकडून संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार अमित साटम यांची मुंबई भाजपाच्याअध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीससुद्धा उपस्थित होते.