esakal | आरोप करणाऱ्या महिलेला ओळखत नाही; आमदार साटम यांचा खुलासा |Amit satam
sakal

बोलून बातमी शोधा

MLA-Amit-Satam

आरोप करणाऱ्या महिलेला ओळखत नाही; आमदार साटम यांचा खुलासा

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

मुंबई : समाजमाध्यमांवर (media) व्हिडिओ प्रसिद्ध (viral video) करून माझ्यावर वाटेल ते आरोप (allegations) करणाऱ्या महिलेला आपण ओळखत नसून तिच्याशी आपला काहीही संबंध नाही, असा दावा अंधेरी (प.) चे भाजप आमदार अमित साटम (Amit satam) यांनी केला आहे.

हेही वाचा: मुंबईत रूग्ण वाढ राज्यात मात्र घट; महिनाभरात 10 टक्क्यांनी रूग्ण वाढ

जुहू येथील एका महिलेने मागील आठवड्यात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिसांवर तसेच साटम आणि काही व्यक्तींवर आरोप केले होते. यासंदर्भातील वृत्ते सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. त्याबाबत साटम यांनी हा खुलासा केला आहे. या महिलेला मी वैयक्तिकरित्या ओळखत नसून माझी त्यांच्याशी कधीही भेट किंवा फोन वर संभाषण झालेले नाही.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी जुहू पोलीस ठाण्यात याबाबत चौकशी केली. या महिलेचे व तिच्या कुटुंबाचे अन्य कोणाबरोबर तरी भांडण झाले होते. त्या महिलेने त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली असून ही महिला त्या तक्रारीच्या कारवाईवर समाधानी नाही. त्यातून हा प्रकार घडला असावा, मात्र गुरुवारी घडलेल्या घटनेशी माझा काहीही संबध नसून त्या ठिकाणी मी किंवा माझे कोणतेही कार्यकर्ते उपस्थित नव्हते, असे साटम यांनी म्हटले आहे.

माझ्यामुळे त्यांना त्रास झाला, असा आरोप या महिलेने व तिच्या पतीने केला आहे. मात्र माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. या महिलेचा पती संजय परदेशी याच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे व या संदर्भात प्रतिबंधत्मक कारवाईही करण्यात आली आहे. इर्ला पंपिंग स्टेशन जवळच्या शासकीय जमिनीवर (नाला लँड) या व्यक्तीने वारंवार अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केल्याचा दावाही साटम यांनी केला आहे. या बांधकामाविरुद्ध महानगरपालिकेने अनेकदा एमआरटीपी अंतर्गत कारवाई केली आहे. हे अनधिकृत बांधकाम महापालिकेने तोडल्यामुळे या कुटुंबाने माझ्यावर व प्रशासनावर खोटे नाटे आरोप केले आहेत. तसेच सन 2019-20 मध्ये मी संजय परदेशी यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे, असेही साटम यांनी म्हटले आहे.

loading image
go to top