esakal | मुंबईत रूग्ण वाढ राज्यात मात्र घट; महिनाभरात 10 टक्क्यांनी रूग्ण वाढ | corona
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत रूग्ण वाढ राज्यात मात्र घट; महिनाभरात 10 टक्क्यांनी रूग्ण वाढ

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत एका महिन्यात रुग्ण संख्या (corona patients) 42 टक्क्यांनी वाढली. गेल्या महिनाभरात मुंबई राज्यापेक्षा 10 टक्क्यांनी रूग्ण वाढीत (patients increases) आघाडीवर आहे. राज्यात (maharashtra) उलट परिस्थिती असून ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये 33 टक्के रुग्णसंख्या (patients decreases) घटली आहे.

हेही वाचा: वूमन कनेक्ट चॅलेंज इंडियाची रिलायन्स फाउंडेशनतर्फे घोषणा

मुंबईत सप्टेंबर महिन्यात रुग्ण वाढल्याचे कारण म्हणजे नागरिकांचा सुरु झालेला प्रवास आणि मनोरंजन क्षेत्रातील निर्बंध शिथिल झाले आहेत. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, “ 15 ऑगस्टपासून लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी रेल्वे प्रवास शक्य झाला आहे. हॉटेल्स सुरु झाले आहेत. लोकांचा प्रवास वाढला आहे. भेटणे वाढले आहे.

सप्टेंबरमधील रुग्णांची संख्या (12,994) ऑगस्ट (9,166) पेक्षा जुलैमध्ये (12,557) सापडलेल्या रुग्णांएवढीच आहे. मुंबईतील मृत्यूंमध्ये कमतरता आली असून ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये मृत्यूंमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये 157 मृत्यू होते ते सप्टेंबरमध्ये 133 वर पोहोचले आहेत. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढली असली तरी ही वाढ भीतीदायक नाही. तसंच सक्रिय रुग्णांची संख्या जरी वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. शहरात गुरुवारी 451 रुग्ण आणि सात मृत्यूंची नोंद झाली. त्यानुसार, मुंबईचा कोविड रुग्णांचा आकडा एकूण 7.42 लाखांवर पोहोचला आणि 16,110 मृत्यूंची नोंद झाली.

हेही वाचा: भाईंदर : अभियंता गोळीबर प्रकरणी कर्मचार्‍यांचे आंदोलन

1 सप्टेंबर रोजी गंभीर रुग्णांची संख्या 413 होती तर 29 सप्टेंबर रोजी ही संख्या घटून 273 वर पोहोचली,असं ही डॉक्टरांनी सांगितले. याच कालावधीतील आयसीयू रुग्णही कमी होऊन 602 वरून 495 वर आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वेगवेगळी क्षेत्रे आता उघडले असूनही  राज्यभरातील रुग्णसंख्या कमी आहे. ज्यातून दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. तसेच राज्यातील मृत्यू ऑगस्टमध्ये 2,809 वरून या महिन्यात 1,754 वर पोहोचले आहेत. सप्टेंबरमध्ये मृत्यूची संख्या फेब्रुवारीनंतर सर्वात कमी आहे.

मृत्यू दर देखील कमी झाला असून सप्टेंबरमध्ये 1.3% मृत्यू दराची नोंद करण्यात आली जो ऑगस्टमध्ये 1.76% एवढा होता. मात्र, मुंबई आणि पुण्यासारखी शहरे अजूनही लक्षणीय संख्या नोंदवत आहेत, परंतु गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आहे आणि त्यामुळे बहुतेक रुग्ण घरी उपचार घेत आहेत किंवा रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ही कमी आहे.

कोविड -19 राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्याची रुग्णसंख्या ही आठ महिन्यांतील सर्वात कमी आहे. जानेवारीची संख्या 94,123 होती. लसीकरणाने रुग्णसंख्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, परंतु लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. मास्क घातलाच पाहिजे.  भविष्यातील कोविड लाटेपासून वाचण्यासाठी दुसरा डोस लवकर घेणे आवश्यक आहे.

loading image
go to top