esakal | मुंबई : ‘बिग बी’ यांची पानमसाला जाहिरातींवर फुली
sakal

बोलून बातमी शोधा

अमिताभ बच्चन

‘बिग बी’ यांची पानमसाला जाहिरातींवर फुली

sakal_logo
By
राहुल शेळके

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज ७९ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांनी एका पान मसाल्यासमवेतचा करार रद्द करत यापुढे अशा प्रकारची जाहिरात करणार नाही, असे जाहीर केले. या निर्णयाची माहिती अमिताभ बच्चन यांच्या अधिकृत ब्लॉगवर देण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या अधिकृत ब्लॉगवर त्यांच्या कार्यालयाच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, एका पान मसाल्याची जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी संबंधित ब्रँडशी संपर्क साधला आणि हा करार थांबवत असल्याचे सांगितले. यानुसार संबंधित ब्रँडबरोबरचा करार रद्द केला असून प्रमोशन फिस देखील परत केली आहे. कराराच्या वेळी संबंधित जाहिरात ही ‘सरोगेट ॲड’असल्याचे ठाऊक नव्हते, असे ब्लॉगवर म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन हे रणवीर सिंह बरोबर पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसले.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभरात मोठा प्रतिसाद; अनेक ठिकाणी तणाव

शाहरुख खान, अजय देवगण यांच्याप्रमाणेच पान मसाल्याची जाहिरात केल्यानंतर बीग बींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. वास्तविक अमिताभ बच्चन यांनी

एक पोस्ट शेअर केली होती. त्यात म्हटले की, एक घड्याळ हातात काय घातले, वेळ मागेच लागली. यावर एका यूजरने मत मांडत म्हटले होते, की नमस्कार सर, केवळ एक गोष्ट आपल्याला विचारायची आहे. पान मसाल्याची जाहिरात करण्याची आपल्याला काय गरज. मग आपल्यात आणि त्या लोकांत फरक काय राहिला?

‘नोट’कडून आव्हान

गेल्या महिन्यात राष्ट्रीय तंबाखू निर्मुलन संस्था (नोट) या स्वयंसेवी संस्थेने बच्चन यांनी पान मसाल्याची जाहिरात करू नये, असे आवाहन केले होते. बीग बी यांनी तंबाखूविरोधी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘नोट’चे अध्यक्ष डॉ. शेखर सालकर यांनी केले होते.

loading image
go to top