कोरोना कचरा निम्म्याने घटला; जैववैद्यकीय कच-याचं प्रमाण देखील कमी

कोरोना कचरा निम्म्याने घटला; जैववैद्यकीय कच-याचं प्रमाण देखील कमी
Updated on

मुंबई,ता. 10 : कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आल्याने राज्यभरातून दैनंदिन जमा होणा-या जैववैद्यकीय कच-याचं प्रमाण देखील कमी झालं आहे. दैनंदिन जमा होणारा कचरा 30 टनांनी घटला असून कच-याचे प्रमाण100 टनावरून प्रतिदिन सरासरी 75 टनांपर्यंत खाली आलं आहे. कोरोना रुग्णसंख्या तसेच अलगीकरण, विलगीकरण कक्ष कमी झाल्याचे हा प्रमाण कमी झाल्याचे दिसते. 

कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये वाढ झाली होती. सप्टेंबरमध्ये दरदिवशी 100 टनांपर्यंत जैववैद्यकीय कचरा जमा होत होता. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात हे प्रमाण घटून प्रतिदिन सरासरी 75 टनांपर्यंत आले आहे. यात इतर जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण 50 टनांच्या आसपासच राहिलं असून कोरोना संबंधी जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये निम्म्यानं घट होऊन 25 टनांच्या आसपास आला असल्याची माहिती प्रधान वैद्यानिक अधिकारी डॉ अमर सुपाते यांनी दिली.

मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर कोरोनाबाधितांच्या उपचारांदरम्यान तयार होणाऱ्या कचऱ्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली. मात्र सुरुवातीस नियमावलीकडे ब-याच प्रमाणात दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे राज्यभरात 10-15 टन जमा होणारा कोरोनाचा कचरा जुलैमध्ये 40 टनांपर्यंत गेल्याचे डॉ सुपाते यांनी सांगितले. जुलैपासून इतर वैद्यकीय उपचार वाढू लागल्यानंतर इतर जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण अचानक दुप्पट झालं. त्यामुळं दरदिवशी एकूण कचरा 100 टन होऊ लागला. सप्टेंबरमध्ये हा आकडा वाढून 100 टनापेक्षाही अधिक झाला असल्याचे ही डॉ सुपाते म्हणाले.

राज्यभरातील कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे दिसते. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना अलगीकरण, विलगीकरण कक्ष कमी झाले. तसेच जैववैद्यकीय कच-याबाबत सुधारित नियमावली तयार केली. यासाठी सर्व महापालिका तसेच नगरपालिकांना विश्वासात घेतलं गेल. कर्मचा-यांना प्रशिक्षण ही देण्यात आल्याचे सुपाते यांनी सांगितले. त्यामुळे कोविड जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण 30 ते 25 टनांपर्यंत खाली आल्याचे सुपाते पुढे म्हणाले. 

राज्यातील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट 24 तासांच्या आत भस्मीकरणाद्वारे केली जाते. सुमारे 75 किलोमीटर परिघात एक केंद्र यानुसार सर्व केंद्रांची एकूण क्षमता सुमारे 60 टन आहे. सप्टेंबरमध्ये वाढत्या कचऱ्याचा ताण केंद्रांवर येऊ लागल्यावर अतिरिक्त कोविड जैववैद्यकीय कचरा तळोजा येथील घातक कचरा विल्हेवाट केंद्रावर पाठविण्यात येऊ लागला. मात्र गेल्या महिनाभरात कोविड कचऱ्याचे प्रमाण अर्ध्यावर आलं असून अन्यत्र कचरा विल्हेवाटीसाठी पाठविणं कमी झाल्याचं समजतं.

मुंबईसह ठाणे परिसरात सर्वाधिक रूग्ण तसेच रूग्णालयांची संख्या आहे. त्यामुळे इथे जैववैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी पाच केंद्र उपलब्ध करण्यात आले. मुंबईसह, ठाणे, तळोजा, कल्याण अणि वसई-विरार येथे कोरोना कच-याची विल्हेवाट लावली जाते. तर सुंपूर्ण राज्यात 28 केंद्र असून त्यांच्या माध्यमातून जैववैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावली जात असून सध्या पुरेशी व्यवस्था कार्यरत असलाचे ही डॉ अमर सुपाते यांनी सांगितले.

amount of biomedical waste and waste due to corona reduced

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com