मुंबईत रात्रीचा कर्फ्यु लागणार ? लाईफलाईन लोकल ट्रेनही सुरु करण्याचा विचार न्यू ईयर नंतरच !

मुंबईत रात्रीचा कर्फ्यु लागणार ? लाईफलाईन लोकल ट्रेनही सुरु करण्याचा विचार न्यू ईयर नंतरच !

मुंबई : मुंबईची लाईफलाईन लोकल सुरु करण्याचा विचार आता ख्रिसमस आणि न्यू ईयर नंतरच होणार असल्याची माहिती आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सूचना देऊनही मुंबईकर हलगर्जीपणा करत असल्याचं दिसून आलं आहे. या सोबतच मुंबईत नाईटक्लबमध्ये हजारो लोक विनामास्क गर्दी करत असल्याचं महापालिकेच्या धाडीदरम्यान समोर आलं आहे. परळमधील बांद्रा क्लबमध्ये मुंबई महापालिकेनं  कारवाई केली. जर मुंबईकरांनी नियम पाळले नाहीत तर, राज्य शासनाला लेखी विनंती पत्र देऊन मुंबईत रात्रीचा कर्फ्यु लावण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी सूचना केली आहे.

याबद्दल नाईट क्लबला 15 दिवसांची मुदत दिली गेली आहे. या मुदतीत वर्तन सुधारले नाही तर नाईलाजानं कठोर पावलं उचलावी लागतील. तर ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर महापालिका नाईट क्लबमधील पार्ट्यांविरोधात कडक पावले उचलणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.
 
दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मुंबईतील लोकल ट्रेन्स तात्काळ सुरु केल्या जाऊ नयेत असं आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचं मत होतं.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील अशीच भूमिका मांडली होती. त्यामध्ये कोरोनाचे आकडे पाहून निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं. दरम्यान आता समोर येणाऱ्या माहितीनुसार मुंबईची लाईफलाईन लोकल सुरु करण्याचा विचार आता ख्रिसमस आणि न्यू ईयर नंतरच होणार असल्याची माहिती आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली आहे. 

lifeline of mumbai local trains will come on track after new year says BMC commissioner iqbal singh rajput

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com