esakal | शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर : अमृता फडणवीस (व्हिडीओ)
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis

अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे, की जवळपास दहा मिनिटे मी तेथे बसले होते. ज्याठिकाणी बसले होते तेथे खाली आणखी जागा होती. चुकीचे वाटत असेल तर माफी मागते. जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नका. मी जिथे बसले तेथे काहीच धोकादायक नव्हते. मी त्याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी नव्हे तर शुद्ध हवा घेण्यासाठी बसले होते. 

शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर : अमृता फडणवीस (व्हिडीओ)

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : लक्झरी क्रुझच्या उद्घाटनावेळी क्रुझच्या काठावर जाऊन सेल्फी काढल्याने ट्रोल झालेल्या अमृता फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे, की जवळपास दहा मिनिटे मी तेथे बसले होते. ज्याठिकाणी बसले होते तेथे खाली आणखी जागा होती. चुकीचे वाटत असेल तर माफी मागते. जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नका. मी जिथे बसले तेथे काहीच धोकादायक नव्हते. मी त्याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी नव्हे तर शुद्ध हवा घेण्यासाठी बसले होते. 

मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या काठावर उभे राहून काढलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरला. आंग्रीया असे या अलिशान जहाजाचे नाव आहे. याबरोबरच मुंबईतील देशांतर्गत क्रूझ टर्मिनलचेही या वेळी उद्‌घाटन करण्यात आले. 

यावेळी उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या काठावर जाऊन सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी काही वेळ जहाजाच्या कडेला थांबून सेल्फी काढला आणि तोपर्यंत पोलिसांना त्यांच्यासाठी तेथेच थांबावे लागले. अमृता फडणवीस यांचा हा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल झाला होता आणि त्यांना ट्रोल करण्यात येत होते. त्यावर त्यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे.

loading image