मलिक यांनी दोन दिवसात माफी मागावी; बजावली कायदेशीर नोटीस | Nawab Malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik, Amruta Fadnavis

मलिक यांनी दोन दिवसात माफी मागावी; बजावली कायदेशीर नोटीस

मुंबई : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मधील शाब्दिक युद्ध आता कायदेशीर पातळीवर आले असून फडणवीस यांच्या पत्नी अमृता (Amruta Fadnavis) यांनी मलिक यांना दोन दिवसांत बिनशर्त माफी मागण्याची (Apologize) कायदेशीर नोटीस (legal notice) आज बजावली.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २८३ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

अमलीपदार्थ प्रकरणात फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर मलिक यांनी थेट फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे आणि त्यांचे ड्रग विक्रेता जयदीप राणा यांच्याशी संबंध असल्याचा आरोप छायाचित्रासह ट्विटरवर केला आहे. मात्र या सगळ्याशी आमचा संबंध नसून एका कार्यक्रमात आयोजकांनी हा फोटो काढला आहे, असे अम्रुता यांनी नोटीसीमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच मलिक यांनी केलेल्या या पोस्टमुळे आमच्या कुटुंबाची बदनामी झाली असून मलिक यांनी संबंधित ट्विट 48 तासात डिलीट करावे आणि बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

पर्यावरण संबंधित एका कार्यक्रमात आयोजकांनी राणा यांना बोलवले होते, आणि अम्रुता किंवा त्यांच्या कुटुंबाचा याच्याशी कोणताही संबंध नाही, असे या नोटीसीमध्ये स्पष्ट केले आहे. मलिक जाणीवपूर्वक नेमकी छायाचित्रे सतत पोस्ट करत असून फडणवीस यांची प्रतिमा मलिन करीत आहेत, असाही आरोप यामध्ये केला आहे. मलिक यांचे जावई समीर यांनी यापूर्वी फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर आज फडणवीस यांनीही कायदेशीर नोटीस देऊन ट्विटरवर शेअर केली आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर मलिक यांनी आरोपांची मालिका सुरू केली आहे.

loading image
go to top