नेटकऱ्यांनी काढले अमृता फडणवीसांच्या मराठीचे वाभाडे!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. काही वेळा नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आहे. पण आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, त्या अशुद्ध मराठी ट्विटवरून! अशुद्ध मराठीत ट्विट केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.  

मुंबई : नेत्यांना त्यांच्या भाषेवरून ट्रोल करायची एकही संधी नेटकरी सोडत नाहीत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. काही वेळा नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आहे. पण आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, त्या अशुद्ध मराठी ट्विटवरून! अशुद्ध मराठीत ट्विट केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.  

'हिरकणी'च बॉक्स ऑफिसवर 'हाऊसफुल्ल'

30 ऑक्टोबरला अमृता फडणवीस यांनी ट्विट करून दिवाळी मिलन कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. यात त्यांनी स्थानी ऐवजी स्तानी, मारून ऐवजी मरून, आव्हानाचेऐवजी अव्हानाचे, लक्षातऐवजी लक्ष्यात असे शब्द वापरले आहेत. त्यावरून नेटकाऱ्यांनी त्यांची थट्टा करत मुख्यमंत्री आणि सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.

दिवाळी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पत्रकारांसोबत फराळ आणि गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिवाळी मिलन कार्यक्रम निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अमृता फडणवीस, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये आणि मुंबईतील पत्रकार मंडळी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amruta Fadnavis wife of Devendra Fadnavis troll on twitter for wrong Marathi tweet