'हिरकणी'च बॉक्स ऑफिसवर 'हाऊसफुल्ल'!

Marathi Movie Hirkani beats Housefull 4 in Maharashtra
Marathi Movie Hirkani beats Housefull 4 in Maharashtra

मागील अनेक दिवस चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते, तो 'हिरकणी' बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय. विशेष म्हणजे याच दिवशी अक्षय कुमार आणि मल्टिस्टारर 'हाऊसफुल्ल 4' रिलीज झाला आणि महाराष्ट्रात हिरकणीने 'हाऊसफुल्ल 4'लाही मागे टाकलंय. सोनाली कुलकर्णीने साकारलेली हिरकणी बघायला मराठी प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

24 ऑक्टोबरला हिरकणी व 25 ऑक्टोबरला 'हाऊसफुल्ल 4' रिलीज झाला. या दोघांमध्ये टक्कर होणार होती. या काळात हिरकणी व हाऊसफुल्ल 4 सह 4 चित्रपट रिलीज झाले. मात्र महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी आपल्या मराठमोळ्या आणि ऐतिहासिक हिरकणीलाच पसंती दर्शवली. पहिल्या आठवड्यातच हिरकणीच्या तिकीटबारीवर हाऊसफुल्लची पाटी झळकू लागली. हिरकणीचे दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी या 'हाऊसफुल्ल'चे फोटो शेअर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रसिकांचे मनःपूर्वक आभार

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

हिरकणी रिलीज झाल्यापासून सोमवारी व मंगळवारीही 150 शोज लागले. त्यानंतर 70 शोज आणखी वाढवले. 

बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाचा खोल कडा उतरुन जाणाऱ्या धाडसी हिरकणीची कथा या चित्रपटातून साकारण्यात आली. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाची कथा चिन्मय मांडलेकर यांनी लिहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com