आनंद महिंद्रांनी केला सायकलरिक्षाचा फोटो ट्विट, हे आहे खास कारण!

टीम ईसकाळ
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि महिंद्रांच्या या ट्विटचीही खूप चर्चा झालीय. एका सायकल रिक्षाचा हा फोटो असून त्यात आणखी एक विशेष बाब आहे, ज्यामुळे महिंद्रा खूश झाले... काय आहे तो फोटो?

मुंबई : उद्योजक आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी ट्विट केलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि महिंद्रांच्या या ट्विटचीही खूप चर्चा झालीय. एका सायकल रिक्षाचा हा फोटो असून त्यात आणखी एक विशेष बाब आहे, ज्यामुळे महिंद्रा खूश झाले... काय आहे तो फोटो?

पोर्नोग्राफीला वेसण घाला : नायडू

आनंद महिंद्रांनी 28 नोव्हेंबरला निरज प्रताप सिंह यांचे ट्विट शेअर केले, ज्यात एक सायकल रिक्षी दिसत आहे. विशेष म्हणजे या सायकल रिक्षाच्या मागे महिंद्रा कंपनीचा लोगो लावला आहे. आणखी एक मजेशीर बाब म्हणजे हा लोगो उलटा लावला आहे, तरी महिंद्रांना या रिक्षावाल्याचे नवल वाटले. या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा म्हणतात, की सायकल रिक्षामागे उलटा लोगो लावलाय ही मजेशीर बाब असली, तरी सायकल रिक्षा चालवणारे चालक हे आदर्श म्हणून महिंद्रा कंपनीकडे बघतात, त्यामुळे त्यांच्या प्रगतीसाठी आपण त्यांना वाहतूकीचे नवीन पर्याय द्यायला हवे. असे आनंद महिद्रांनी ट्विटमध्ये म्हणले आहे. 

चारचाकी वाहनांवर लावण्यात येणाऱ्या ''फास्टॅग'ला मुदतवाढ

या ट्विटवरून आनंद महिंद्रा यांचा दिलदार स्वभाव व दुसऱ्याटी प्रगती करण्यासाठी घेतलेले कष्ट दिसतात. ते नेहमीच असे हटके ट्विट करत असतात. यावेळी महिंद्राचा लोगो असलेल्या सायकल रिक्षाचा फोटो ट्विट केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. तसेच आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शपथविधीनंतर ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छांच्या या ट्विटमध्ये ते म्हणतात की, 'उद्धव ठाकरे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आज तुमचे वडिल अभिमानाने तुमच्याकडे बघत असतील. मला आपली आपण तरूण असतानाची भेट आठवतीय. तेव्हा आपण नवनवीन कल्पना एकमेकांसमोर मांडल्या होत्या. मला आशा आहे की, तुम्ही तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वापराल!'   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Mahindra tweets about Cycle Auto with Mahindra Logo