
ठाणे : ठाणे पालिकेच्या माध्यमातून ठाण्याचे गौरव असलेल्या गडकरी रंगायतन या वस्तूचे नुतनीकरण करण्यात आले. असे असले तरी, ज्यांच्या प्रयत्नांनी ही वस्तू उभी राहिली, तसेच ज्यांचे मोलाचे योगदान आहे. असे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांची नावे असलेली कोनशीला कोपऱ्यात टाकण्यात आल्याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्यप्रवक्ते आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त केली.