esakal | आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला | Anandrao Adsul
sakal

बोलून बातमी शोधा

anandrao adsul

आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सिटी सहकारी बँक (city-co operative bank) गैरव्यवहार (scam) प्रकरणात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao adsul) यांनी अटकपूर्व जामिनासाठी (Anticipatory bail) केलेली याचिका (petition) आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) फेटाळून लावली आहे. तसेच, जामिनासाठी रितसर सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा: दसऱ्यानिमित्त प्रवाशांनी लोकलला सजवले; महिला प्रवाशांनी केला गरबा

अडसूळ सिटी सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना खातेधारकांचे पैसे बेकायदेशीरपणे बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले. त्यात सुमारे नऊशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, अशी फिर्याद आमदार रवी राणा यांनी केली आहे. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीला बोलविले होते; मात्र प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे सांगून अडसूळ ईडीसमोर हजर झाले नाहीत. ईडीने त्यांच्या कार्यालयावरही धाडी टाकल्या आहेत. ईडीने दाखल केलेला प्राथमिक तपास अहवाल (ईसीआयआर) रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी अडसूळ यांनी याचिकेत केली होती.

न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी यावर सुनावणी झाली. अडसूळ यांचा या घोटाळ्यात कोणताही संबंध नाही. केवळ राणा यांच्या विरोधात निवडणूक याचिका केली म्हणून राजकीय हेतूने हा आरोप केला आहे, असे अडसूळ यांचे वकील ॲड. अभिनव चंद्रचूड यांनी केला; मात्र खंडपीठाने हा युक्तिवाद अमान्य केला आणि याचिका नामंजूर केली.

अडसूळ ठणठणीत!

ईडीने चौकशी सुरू केल्यावर तब्येत ठणठणीत असतानाही अडसूळ प्रकृतीची सबब पुढे करत वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले. त्यामुळे तपास कसा करणार, असा सवाल अतिरिक्त साॅलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला; तर आनंदराव अडसूळ सध्या एसआयव्ही रुग्णालयात दाखल आहेत. यापूर्वी गोरेगाव येथील लाईफलाईन केअर रुग्णालयात ते उपचार घेत होते.

loading image
go to top