अरे बापरे!  लॉकडाऊन काळात तणावासोबत वाढतोय संताप; 'हे' आहे मुख्य कारण..वाचा महत्वाची बातमी..

भाग्यश्री भुवड
Thursday, 16 July 2020

 ‘कोविड-19’ च्या प्रादुर्भावामुळे सर्व देशांतील अर्थव्यवस्थांवर आणि उद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे.

मुंबई : ‘कोविड-19’ च्या प्रादुर्भावामुळे सर्व देशांतील अर्थव्यवस्थांवर आणि उद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे. कोरोनाची साथ आणि टाळेबंदी यांच्यामुळे बेरोजगारी, वेतन कपात आणि सक्तीने घरातूनच काम करणे ही परिस्थिती सर्वांवर ओढवली असल्याने अनेकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावू लागले आहेत. यामध्ये पुरेशी झोप न लागणे, पाठदुखी, थकवा, तणाव, चिंता आणि काही जणांमध्ये संतापाची भावना या समस्यांचा उद्रेक झाला आहे.

पुरुषांमध्ये अधिक संताप - 

यातील संतापाची भावना खरेच अस्तित्वात असल्याचा निर्वाळा ‘टाटा सॉल्ट लाइट’ या एका सर्वेक्षणाने दिला आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की काम आणि तंत्रज्ञान यांच्याबद्दलच्या संतापाला पुरुष अधिक प्रमाणात बळी पडतात. कामासंबंधीच्या तणावामुळे 20 टक्के स्त्रियांमध्ये मोठा तणाव असतो. सक्तीने काम करायला भाग पाडले, तर आपल्या संतापाचा स्फोट होतो, अशी कबुली 64 टक्के पुरुषांनी दिली आहे, तर ही कबुली देणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण 58 टक्के आहे. या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, तरुणाई (जनरेशन झेड - 18 ते 25 वर्षे वयोगटातील व्यक्ती) ही तंत्रज्ञानातील किरकोळ व्यत्ययांमुळे देखील आपला संयम गमावते, त्या तुलनेत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती संतुलन राखून असतात. तरुणाईतील 6 जणांपैकी 1, म्हणजे 16 टक्के व्यक्ती कबूल करतात, की तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या हे त्यांच्या तणावाचे प्रमुख कारण आहे. 45 वर्षांपुढील वयाच्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण 12 टक्के आहे.

 हेही वाचा: ठाण्यात बेड्सची कमतरता, तर कल्याण डोंबिवली कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

हे उपाय महत्वाचे -

या सर्व परिस्थितीवर टाटा न्यूट्रीकोर्नरच्या न्यूट्रिशन तज्ज्ञ कविता देवगण यांनी काही सांगितले की, ‘’उच्च रक्तदाब हा शहरातील नागरिकांमध्ये, विशेषतः पुरुषांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा आजार आहे. तो टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची गरज आहे. आपण घरातून काम करत असू, तर अधूनमधून खुर्चीतून उठणे किंवा दर एका तासाने फिरून येणे आवश्यक आहे. रेस्टॉरंट्समधून जेवण मागवण्यापेक्षा घरीच पारंपरीक पदार्थ बनवावेत. जलद चालणे, योगासने, जलतरण यांसारखे व्यायाम करावेत. रात्री 6 ते 8 तास झोप घेणेही आवश्यक आहे.’’

ग्राहकांच्या खरेदीचे स्वरुपही बदलले - 

‘कोविड-19' उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ग्राहकांच्या खरेदीचे स्वरुपही बदलले आहे. ‘अॅक्सेन्चर’ च्या संशोधन अहवालानुसार, खरेदी करण्याची सवय कायमची बदलण्याची ग्राहकांना गरज वाटत आहे. अन्न मर्यादित आणि आरोग्यपूर्ण वस्तूंची जाणीवपूर्वक खरेदी करणे या दोन प्राधान्याच्या बाबी झाल्या आहेत. सोयीस्कर, साठवणुकीस सोप्या आणि आरोग्य व पोषणासाठी योग्य अशा उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याचे एफएमसीजी कंपन्यांचे निरीक्षण आहे.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या भारतातील पॅकेज्ड फूड्स विभागाच्या प्रेसिडेंट रिचा अरोरा यांनी सांगितले की, कोविड- 19 च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, घरगुती शिजवलेल्या जेवणाला, विशेषतः निरोगी आणि पौष्टिक अशा पारंपरीक भारतीय पदार्थांना मागणी वाढली असून त्या अनुषंगाने ग्राहकांच्या सवयीही बदलल्या आहेत. 

हेही वाचा: मद्यविक्रेते म्हणतायत, "नाहीतर आमचंही शटर होईल कायमचं डाऊन", असं झालं तर तळीरामांची चिंताही वाढेल

ही सर्वात वाईट मंदी - 

मानांकन, संशोधन आणि जोखीम, धोरण सल्लागार सेवा देणाच्या ‘क्रिसिल’ या भारतीय विश्लेषक कंपनीच्या मतानुसार, स्वातंत्र्यानंतर आलेली ही भारतातील चौथी आर्थिक मंदी आहे; आर्थिक उदारीकरणानंतरची ही पहिली मंदी आहे, तर कदाचित आतापर्यंतची ही सर्वात वाईट मंदी ठरणार आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

Anger grows with stress during lockdown here is the reason 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anger grows with stress during lockdown here is the reason