ब्रेकिंग : अनिल अंबानी यांचा राजीनामा

ब्रेकिंग : अनिल अंबानी यांचा राजीनामा

कर्जविळख्यात सापडलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या (आरकॉम) संचालक पदावरून अनिल अंबानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. अनिल अंबानी यांच्या बरोबरच छाया विराणी, रायना करानी, मंजरी केकर, सुरेश रंगाचार यांनी देखील संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. रेग्युलेटरी फाइलिंग मिटिंगमध्ये त्यांनी याबाबतची घोषणा केलीये.  

आरकॉम ही सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. स्वीडनची टेलिकॉम कंपनी एरिक्सन थकीत रक्कम प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर कंपनीने सर्व देणी पकडून जुलै - सप्टेंबर तिमाहीत 30,142 कोटींचा तोटा नोंदविला आहे.

आरकॉमचे CFO मणिकांतन यांचाही राजीनामा 

BSE ला दिल्या गेलेल्या माहितीत  आरकॉमचे CFO मणिकांतन यांनी देखील मागच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये राजीनामा दिल्याचं सांगितलंय. या सर्वांचे राजीनामे कंपनीच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्समध्ये ठेवले जाणार आहेत. 

जुलै - सप्टेंबर तिमाहीत 30,142 कोटींचा तोटा

कर्जविळख्यात सापडलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या आहे. अशात जुलै - सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला 30,142 कोटींचा तोटा  झालाय.  

Webtitle : Anil Ambani resigns from the post of Director of Reliance Communications 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com