बायको उचलतेय खर्च, खटला लढवण्यासाठी विकावे लागतायत दागिने, अनिल अंबानींचा कोर्टात दावा

बायको उचलतेय खर्च, खटला लढवण्यासाठी विकावे लागतायत दागिने, अनिल अंबानींचा कोर्टात दावा

मुंबई, ता.26 ; कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलेले अनिल अंबानी यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. खटला लढवण्यासाठी दागिने मोडण्याची वेळ आली असल्याचे अनिल अंबानी यांनी इंग्लडच्या कोर्टात सांगीतले आहे. ते साधारण आयुष्य जगत असून, त्यांच्याकडे एक कार असल्याचा दावा त्यांनी खटल्यादरम्यान केला आहे.

कर्ज न चुकवल्याप्रकरणी इंडस्ट्रियल एंड कमर्शीयल बँक ऑफ चायना, एक्स्पोर्ट एंड इम्पोंर्ट बँक ऑफ चायना आणि चायना डेव्हलपमेंट बँकेने अंबानी यांना इंग्लडच्या कोर्टात खेचले असून, त्याची सुनावणी सुरु आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून अंबानी यांनी आपली बाजू मांडली.

गेल्या सहा महिन्यात साडे नऊ कोटींचे दागिने विकले, घरात आता कुठलीही महागडी वस्तु शिल्लक राहीली नसल्याचे अनिल अंबानी यांनी म्हटले. अंबानी यांच्याकडे लक्जरी कारचा ताफा असल्याचा आरोप बँकेच्या वकीलांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देतांना ही चुकीची माहिती माध्यमांनी पसरवली असून, माझी राहणी अंत्यत साधी असून मी मद्य, सिगरेट पीत नाही. आता माझ्याकडे केवळ एक कार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

22 मे 2020 ला इंग्लडच्या कोर्टाने अनिल अंबानी यांना चीनच्या तीन बँकाचे साडेपाच हजार कोटी 12 जूनपर्यत चुकवण्याचे आदेश दिले होते. रिलायन्स कम्युनीकेशन या कंपनीसाठी वैयक्तीक हमीवर अंबानी यांनी या तीन बँकाकडून कर्ज घेतलं होतं. मात्र कर्जाची परतफेड अनिल अंबानी करु शकले नाही. 

या बँकानी अंबानी याच्या संपत्तीबद्दल खुलासा करण्याची मागणी केली होती. अनिल अंबानी यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केल. त्यामध्ये आपल्यावर 5 अब्ज डॉलरचे कर्ज असून, त्यांच्याकडे असलेल्या 1.20 कोटी शेअरला कुठलीच किमंत नसल्याची माहिती कोर्टाला दिली होती.

माझा खर्च अंत्यत कमी असून, सर्व खर्च पत्नी उचलते. सध्या आर्थिक परिस्थिती नाजुक असून, मुलांकडून कर्ज घेण्याची वेळ आल्याचे त्यांनी कोर्टाला सांगीतले. इतर खर्च भागवण्यासाठी संपत्ती विकावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले. अनिल अंबानी यांनी महागड्या स्टोअर्समधून खरेदी केल्याचा मुद्द्यावर स्पष्टीकरण आईने ही खरेदी केल्याचे सांगीतले. मी कधीच क्रेडीट कार्डचा वापर करत नाही, असही त्यांनी म्हटले. त्यांच्याकडे असलेल्या महागड्या पेंटीग्सची मालकी पत्नीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

( संपादन - सुमित बागुल )

Anil Ambani tells UK court he owns nothing meaningful during loan repayment case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com