esakal | देशमुखांनी CBI विरोधात केलेल्या याचिकेवर गुरुवारी निर्णय- HC
sakal

बोलून बातमी शोधा

Anil deshmukh

देशमुखांनी CBI विरोधात केलेल्या याचिकेवर गुरुवारी निर्णय- HC

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : माजी ग्रुहमंत्री अनील देशमुख (Anil Deshmukh) यांनी सीबीआयच्या एफआयआर विरोधात केलेल्या याचिकेवर (Petetion) मुंबई उच्च न्यायालय ता. 22 , गुरुवारी फैसला देणार आहे. सीबीआयने (CBI) देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून एफआयआर दाखल केला आहे. याविरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात (High Court) याचिका केली आहे. सीबीआय जाणीवपूर्वक, राजकीय हेतूने आरोप करत आहे आणि. कायदेशीर तरतुदींचे पालन करत नाही, असा युक्तिवाद देशमुख यांच्या वतीने करण्यात आला आहे. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे . जमादार यांचे खंडपीठ फैसला सुनावणार आहेत. ( Anil Deshmukh Petition Against CBI decision on Thursday says high Court- nss91)

हेही वाचा: Murder Case : प्रविण मिश्रासह दोघांची जन्मठेपेची शिक्षा कायम- हायकोर्ट

राज्य सरकारने देखील या एफआयआरमधील दोन परिच्छेद वगळण्यासाठी याचिका केली आहे. सीबीआय पोलीस बदल्या आणि फोन टॅपिंग प्रकरणात हस्तक्षेप करत आहे असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. सीबीआयने दोन्ही आरोपांचे खंडन केले असून तपास करण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे. सीबीआयने या प्रकरणात सर्व संबंधितांचा तपास करायला हवा, केवळ देशमुख यांचीच चौकशी करु नये, आणि निलंबित पोलीस सचिन वाझेला नियुक्त करणार्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबाबतही प्रश्न उपस्थित केले होते. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खंडणी वसुलीच्या आरोपांवर एड जयश्री पाटील यांनी एफआयआर केला आहे. या एफआयआरची प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी दिले होते.

loading image