esakal | Murder Case : प्रविण मिश्रासह दोघांची जन्मठेपेची शिक्षा कायम- हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

high court

Murder Case : प्रविण मिश्रासह दोघांची जन्मठेपेची शिक्षा कायम- हायकोर्ट

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : सन 2011 मध्ये बांधकाम व्यावसायिक प्रदीप ढोकालिया यांच्या सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याच्या खटल्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिमचा (Dawood ibrahim) हस्तक प्रवीण मिश्रा उर्फ सचिनसह दोघांना सत्र न्यायालयाने (Session Court) सुनावलेली जन्मठेपेची सजा मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) कायम केली आहे. (Pradeep Dhokaliya bodygaurd murder case accused punishment no relief says Mumbai high court)

ढोकालिया यांचे सुरक्षारक्षक अजीत येरुणकरच्या हत्या खटल्यात न्यायालयाने मिश्रा आणि त्याचा साथीदार अभिषेक सिंह उर्फ हर्षू यांना जन्मठेप आणि साठ हजार रुपये दंड सुनावलेला आहे. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील याचिका केली होती. याचिकेवर न्या साधना जाधव आणि न्या एन आर बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

हेही वाचा: मुंबई - नवी मुंबई विमानतळ : अफवांचे अदाणींकडून खंडन

या खटल्यातील पुरावे आणि कागदपत्रे पाहता सत्र न्यायालयाने दिलेला निकाल योग्य असून यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या खटल्यात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांनी दिलेली जबानी न्यायालयाने ग्राह्य धरले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या जबानीत विसंगती आहे, असा बचाव आरोपींकडून करण्यात आला होता. मात्र खंडपीठाने हा युक्तिवाद अमान्य केला.

मरीन लाईन्समध्ये असलेल्या ढोकालिया यांच्या कार्यालयात आरोपी 8 फेब्रुवारी 2011 मध्ये गेले होते. त्यावेळी स्वागतिका, मैनेजर आणि दोन सुरक्षा रक्षक उपस्थित होते. आरोपींनी गोळीबार केल्यांनंतर पिस्तुलाची एक गोळी येरुणकर यांनी चुकविली पण दुसरी गोळी त्यांच्या शरीरात शिरली आणि त्यांचा म्रुत्यु झाला होता.

loading image