esakal | दिड वर्षानंतर पोलीस बदल्यांना मुहूर्त; ८५ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

दिड वर्षानंतर पोलीस बदल्यांना मुहूर्त; ८५ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तब्बल दिड वर्षापासून रखडलेल्या बदल्यांना (job transfers) अखेर मुहुर्त मिळाला आहे. राज्य पोलीस दलातील (police department) ८५ पोलीस उपायुक्त-पोलीस अधिक्षकासह ९८ सहाय्यक पोलीस आयुक्त-पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या गुरुवारी सायंकाळी गृहविभागाने (home ministry) अंतर्गत बदल्या केल्या आहे. बदल्या झालेल्या पोलीस अधिकार्‍यांना त्यांच्या नवीन नियुक्त झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. कोरोना (corona) संसर्ग आणि रश्मी शुक्ला (rashmi Shukla) यांच्या टेप प्रकरणानंतर या नियमित बदल्या रखडल्या होत्या. बदल्यावरुन भ्रष्ट्राचाराचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्यावर लावण्यात आले होते. या नंतर अंत्यत काळजीपुर्वक आणि नियमावर बोट ठेऊन या बदल्या केल्याचे दिसतंय.

हेही वाचा: पनवेल रेल्वे स्टेशनवर खेचली चैन; नातेवाईक आणि पोलिसांमध्ये जूंपली

वादग्रस्त अधिकाऱ्याला क्रिम पोस्ट?

पराग मणेरे या वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याला क्रिम पोस्ट मिळाली आहे. त्यांना उत्पादन शुक्लच्या अप्पर पोलिस अधिक्षकपदी नागपूरला पाठवण्यात आले आहे. मणेरे हे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून ओळखले जात होते. ठाण्यात कार्यरत असतांना खंडणी मागण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मणेरे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्तपदावर कार्यरत होते.

loading image
go to top