esakal | पनवेल रेल्वे स्टेशनवर खेचली चैन; नातेवाईक आणि पोलिसांमध्ये जूंपली
sakal

बोलून बातमी शोधा

Panvel station

पनवेल रेल्वे स्टेशनवर खेचली चैन; नातेवाईक आणि पोलिसांमध्ये जूंपली

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

नवी मुंबई : गणेशोत्सवाकरीता (Ganpati Festival) कोकणात जाणाऱ्या सहप्रवाशांना येण्यास उशिर झाल्यामुळे चैन खेचून (pulling chain) गणपती विशेष रेल्वे रोखून (Ganpati special train) धरण्याचा प्रकार पनवेल रेल्वे स्थानकात (panvel railway station) घडला. या प्रकरणी चैन खेचणाऱ्या त्या प्रवाशाला पकडण्यास आलेल्या रेल्वे पोलिसांमध्ये (railway police) आणि प्रवाशाच्या नातेवाईकांमध्ये चांगलीच जूंपली. परंतू या दरम्यान रेल्वे सुरु झाल्याने नातेवाईक चालत्या रेल्वेत बसून गावाला निघून गेले.

हेही वाचा: पोलीस महिलेने घडवली सहकाऱ्याची हत्या ; तीन आरोपींना अटक

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकरीता रेल्वे प्रशासानाने अतिरीक्त विशेष रेल्वे सोडल्या आहेत. या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बेफिकीरीमुळे कोकणात जाणारी रेल्वे काही वेळाकरीता रोखून धरण्यात आली होती. गुजरातहून कोकणात जाणारी गणपती विशेष रेल्वे पनवेल रेल्वे स्थानकात ८.३० च्या सुमारास दाखल झाली. या रेल्वेने कोकणात जाणारे काही प्रवासी प्रतिक्षेत होते. परंतू या प्रवाशांचे काही नातेवाईक असणारे सहप्रवासी हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनने पनवेल रेल्वे स्थानकात पोहोचत होते.

दरम्यानच्या काळात खांदेश्वर रेल्वे स्थानक आणि पनवेल रेल्वे स्थानकामध्ये काही तांत्रिक कारणामुळे सर्व लोकल थांबल्या होत्या. थांबलेल्या लोकलमध्ये आपले नातेवाईक प्रवासी न आल्याने कोकणात रेल्वे जाणाऱ्या प्रवाशाने डब्यात पोहोचून रेल्वेची चैन ओढली. चैन ओढल्यामुळे रल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चैन खेचणाऱ्या प्रवाशाला पकडले. तसेच त्याला पकडून पोलिस ठाण्यात घेऊन चालले होते. परंतू याच वेळात लोकलने प्रवास करणारे नातेवाईक आल्याने त्यांनी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासोबत हूज्जत घालत चालत्या रेल्वेमध्ये बसून गावाला निघून गेले. या प्रकरणाची आपल्या वरिष्ठांना कल्पना दिली असून सखोल चौकशी करून अहवाल सादर करणार असल्याचे पोलीस अधिकारी जोयजोडे यांनी सांगितले.

loading image
go to top