esakal | अनिल देखमुखांच्या दोन्ही सचिवांची CBI कडून चौकशी

बोलून बातमी शोधा

अनिल देखमुखांच्या दोन्ही सचिवांची CBI कडून चौकशी

अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यकांना जबाब नोंदवला. त्यांना नुकतीच सीबीआयने समन्स बजावले होते. 

अनिल देखमुखांच्या दोन्ही सचिवांची CBI कडून चौकशी

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यकांना जबाब नोंदवला. त्यांना नुकतीच सीबीआयने समन्स बजावले होते. 

अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या कुंदन आणि पालांडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. सीबीआयने याप्रकरणात नुकतीच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील यांचा याप्रकरणी जबाब नोंदवला होता. त्यावेळी पालांडे यांनीच संजय पाटील आणि उपायुक्त राजू पाटील यांना 100 कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात सांगितले होते, असे परमबीर सिंह यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले होते. न्यायालयाने याप्रकरणी प्राथमिक चौकशी करून 15 दिवसात त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार या दोघांनाही सीबीआयच्या सांताक्रुझ येथील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे बोलण्यात आले होते. आता सीबीआयच्या प्रश्नांबाबत त्यांनी काय स्पष्टीकरण दिले, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हफ्ता वसूली प्रकरणात सीबीआयचा तपास आता मिरारोड येथील बार मालकाभोवती तपास फिरू लागला आहे. या बारमालकाचे नाव एनआयएच्या हाती लागलेल्या सचिन वाझेच्या डायरीत समोर आले होते. या बारमालकाचे नाव महेश शेट्टी असे आहे.  त्यानुसार सीबीआयने शेट्टीबाबत तपास सुरू केला आहे. याखेरीज मुख्य तक्रारदार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त राजू भुजबळ आणि निलंबित सहपोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यांचा जबाबदेखील नोंदविण्यात आला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वाझेंवरील आरोपांबाबत ईडीही तपासणी करणार

टीआरपी गैरव्यवहारातही सचिन वाझेंनी 30 लाख रुपये घेतले होते, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बार्क’ कडून सचिन वाझे यांनी गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकाच्या मदतीने 30 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या कर्मचा-यांना त्रास न देण्याच्या नावाखाली वाझेंनी लाच घेतल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा- दिर्घकाळ बाधा असलेल्या रुग्णांसाठी पंचतारांकित हॉटेल? पालिका घेणार निर्णय

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Anil deshmukh two secretaries inquiry done by cbi in parambir singh case