esakal | दिर्घकाळ बाधा असलेल्या रुग्णांसाठी पंचतारांकित हॉटेल? पालिका घेणार निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

दिर्घकाळ बाधा असलेल्या रुग्णांसाठी पंचतारांकित हॉटेल? पालिका घेणार निर्णय

10 दिवसानंतरही या रुग्णाचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह असेल तर पुढील उपचारासाठी हॉटेलमध्ये पाठवले जाणार आहे.

दिर्घकाळ बाधा असलेल्या रुग्णांसाठी पंचतारांकित हॉटेल? पालिका घेणार निर्णय

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: दिर्घकाळ कोविडचे बाधा असलेल्या रुग्णांसाठी आता पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेण्याचा निर्णय सध्या महापालिका करत आहे. येत्या दोन दिवसात यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. चार हॉटेल्समधील 600 खोल्या महापालिका ताब्यात घेण्याचा विचार आहे. याचे शुल्कही संबंधित रुग्णाला भरावे लागणार आहे. 

कोविडची बाधा होऊन लक्षण असलेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले जातात. मात्र,10 दिवसानंतरही या रुग्णाचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह असेल तर पुढील उपचारासाठी हॉटेलमध्ये पाठवले जाणार आहे. तेथे खासगी रुग्णालयांमार्फत उपचार करण्यात येणार असल्याची अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं दिली. रुग्णालयात नव्या रुग्णांना जागा मिळावी तसेच येत्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यास बेड्स कमी पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिका अधिकारी आणि टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची बैठक घेतली. या बैठकीत या पर्यायावर चर्चा करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईतील ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत आजपासून पुन्हा लसीकरण सुरू 

पालिकेला कोविड-19 लस साठा उपलब्ध झाल्याने आजपासून मुंबईतील निर्देशित 71 पैकी 62 खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत 49 तर खासगी रुग्णालयात 71 लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी 40 ते 50 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. 

 हेही वाचा- मुंबईत आता 'या' रुग्णालयांमध्ये रेमडेसेवीरचा पुरवठा बंद

मुंबईत लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या 71 खासगी रुग्णालयात,10 एप्रिल आणि रविवार, 11 एप्रिल 2021 असे दोन दिवस लसीकरण थांबले होते. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होते.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Virus bmc currently deciding take over five star hotels for patients