गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी ST सज्ज, ई-पासची गरज नाही; पण आधी 'हे' नियम वाचून घ्या...

प्रशांत कांबळे
Tuesday, 4 August 2020

कोंकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमाने खासगी वाहनाने जात असल्यास त्यांना ई-पास अनिवार्य आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या बसने जात असल्यास त्यांना ई-पासची गरज राहणार नाही.

मुंबई : गणेशउत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलीये. परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी चाकरमान्यांसाठी तिन हजार बसेस बुधवार (ता.4) पासून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी गणपती उत्सवासाठी 2200 बसेस सोडण्यात येतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवाशांना सुरक्षीत प्रवास करता यावा यासाठी जादा बसेसची सोडण्याचा येणार आहेत. मंगळवार या बसेसच्या ऑनलाईन बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आल्याची घोषणासुद्धा यावेळी परिवहन मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी केली आहे. 

Inside story : अयोध्येत मिशीसहित श्रीरामांच्या मूर्तीची का होतेय मागणी?

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी STची सेवा कधी सुरू होणार याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागले होते. मात्र, मंगळवारी परिवहन मंत्री परब यांनी यासंदर्भातील घोषणा करून चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. मात्र, कोरोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने 12 ऑगस्टपुर्वी जाणाऱ्यांना गावी गेल्यानंतर 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. तर 12 ऑगस्टनंतर गावी जाणाऱ्यांना मुंबईमध्येच आपले स्वॅब तपासणी केल्यानंतर तपासणी निगेटिव्ह आली तरच प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. 

एका बसमध्ये फक्त 22 प्रवाशांनाच प्रवास करता येणार असून, एकाच गावातील असलेल्या चाकरमान्यांना ग्रुप बुकिंगसुद्धा करता येणार आहे. हे बुकिंग फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून या प्रवाशांना पाँईंन्ट टु पाँईंन्ट सोडण्यात येणार आहे. त्यानंतर या बसेस त्याच ठिकाणी गणेशोत्सव संपण्यापर्यंत मुक्काम राहणार आहे. त्यानंतर या प्रवाशांना परत आणले जाणार आहे. त्यामूळे कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना परतीचे तिकीटाचे बुकिंग सुद्धा आताच करता येणार आहे. 

हेही वाचा : श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा; शिवसेनेचे नेते म्हणतात आम्ही श्रद्धेचा इव्हेंट करणार नाही...

ई-पासची गरज नाही : 

कोंकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमाने खासगी वाहनाने जात असल्यास त्यांना ई-पास अनिवार्य आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या बसने जात असल्यास त्यांना ई-पासची गरज राहणार नाही. त्यांनी फक्त एसटीचे ऑनलाईन बुकिंग करून, 12ऑगस्टपूर्वीच  गावी जाऊन 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. 

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना महामंडळाकडून नियमीत भाडे आकारले जाणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केली जाणार नाही. दरम्यान खासगी वाहतुकदारांना सुद्धा एसटीच्या दिडपट भाडे वाढीचीच परवानगी आहे. मात्र, खासगी वाहतूकदार एसटीच्या तिकीटापेक्षा जास्त भाडे आकारत असल्यास त्यांच्यावर बुधवार पासूनच कारवाई सुरू करण्यात येणार आहे असं परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील म्हणालेत. 

( संकलन - सुमित बागुल )

anil parab and satej patil press conference for permission for the people who want to go to konkan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil parab and satej patil press conference for permission for the people who want to go to konkan