esakal | परिवहन मंत्र्यांचे कार्यालय ऑक्टोबर महिन्यात होणार जमीनदोस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Anil parab

परिवहन मंत्र्यांचे कार्यालय ऑक्टोबर महिन्यात होणार जमीनदोस्त

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर (Bandra Office) तोडक कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी (lokayukta) दिले आहेत. त्यानुसार ऑक्टोबर (October) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे बांधकाम पाडण्यात (construction demolish) येईल, असे राज्य सरकारच्या (mva government) वतीने लोकायुक्तांना सांगण्यात आले आहे. यावर लोकायुक्तांनी बांधकामावर कारवाई केल्यानंतर एक महिन्याच्या आत कार्यालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: मुंबईत मलेरियाची रुग्णवाढ; घरातच सापडतोय डेंगींचा डास

परिवहन मंत्री अनिल परब यांनी गांधी नगर येथील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळी जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. बांधकाम तोडून संबंधित जागा नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती सोमय्या यांनी याचिकेद्वारे लोकायुक्तांकडे केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. या सुनावणी वेळी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अधिकाऱ्यांनी बांधकाम ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावर लोकायुक्तांनी राज्य अनधिकृत बांधकाम पडल्यानंतर एका महिन्याच्या आत कार्यालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा हात असलेले मिलिंद नार्वेकर यांचा अनधिकृत बंगला पडल्यानंतर आता त्याचा उजवा हात असलेले आणि मंत्री अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय पडणार, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

loading image
go to top