esakal | मुंबईत मलेरियाची रुग्णवाढ; घरातच सापडतोय डेंगींचा डास
sakal

बोलून बातमी शोधा

mosquito

मुंबईत मलेरियाची रुग्णवाढ; घरातच सापडतोय डेंगींचा डास

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : कोविडचा संसर्ग (Corona Infection) नियंत्रणात आलेला असताना मुंबईत डेंगी आणि मलेरीयाचे रुग्ण (malaria patient) वाढत आहे. मात्र, डेंगी पसरवणारा एडिस डास (aedes mosquitos) घरातच सापडत आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत महानगरपालिकेच्या (BMC) पथकाने 91 लाख 81 हजार ठिकाणची तपासणी केली असून त्यातील 49 हजार 605 ठिकाणी एडिस आणि 9 हजार 279 मलेरीया पसरवणारे एनोफिलीस डासांचे (anopheles mosquitoes) अड्डे सापडले आहेत.

हेही वाचा: BMC : मुंबईतील 80 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

महानगर पालिकेच्या किटक नाशक विभागा मार्फत वर्षभर डास विरोधात मोहीम सुरु असते. यात, घरा घरात डासांची पैदास होऊ शकेल अशी ठिकाणे शोधण्या बरोबरच घरांच्या परीसरातही डासांची पैदास शोधण्यात येते. डेंगींच्या डासांचे अड्डे शाेधण्यासाठी महापालिकेच्या पथकाने 89 लाख 21 हजार 588 ठिकाणांची पाहाणी केली. त्यातील 49 हजार 605 ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळली.अशी माहिती किटक नाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.तर,घराबाहेरील 2 लाख 59 हजार 669 ठिकाणची तपासणी केल्यावर 9 हजार 279 ठिकाणी मलेरिया पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती आढळली.असेही सांगण्यात आले.

संकट दूर ठेवा

नारळाची करवंटी,प्लास्टीकचा पेला याच बराेबर चमचा भर पाण्यातही डेंगी आणि मलेरीयाचा डास जन्माला येऊ शकतो.त्यामुळे घराच्या परीसरात तसेच घरात हे डास पोचले जातात.पालिकेच्या पथकाने 1 जानेवारी पासून 6 सप्टेंबर पर्यंत घरांच्या छपरावरु तसेच आवारातून 3 लाख 25 हजार 429 ऑड आर्टिकल म्हणजे डासांची पैदास होऊ शकतील अशा वस्तू हटवल्या आहेत.त्याच बरोबर 13 हजर 515 टायर्स हटविण्यात आले.

- डेंगी पसरवणारा डास शोधण्यासाठी महानगर पालिकेच्या पथकाने पाण्याचे पिंप,टायर,फेंगशुई झाडे,मनी प्लांट,ट्री प्लेट अशा वस्तुंची पाहाणी केली.

-मलेरीया पसरवणाऱ्या डांसांचा शोध विहीर,पाण्याच्या टाक्या,तरण तलाव,पाणी साचून राहीतील अशा लहान मोठ्या वस्तूंचा शोध घेण्यात आले.

loading image
go to top