esakal | किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit-Somaiya

किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : गेल्या काही दिवसात परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) आणि त्यांच्या विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात (corruption) भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याकडून सातत्याने आरोप लावले जात आहेत. या बिनबुडाच्या आरोपामुळे जनमानसात आपली प्रतिमा मलिन होत असून, कुटुंबाची नाहक बदनामी होत असल्याचे सांगत अनिल परब (Anil Parab) यांनी त्यांच्या वकीलामार्फत किरीट सोमय्या यांना तब्बल 100 कोटीच्या मानहानीचा दाव्याची नोटीस (Defamation Suite notice) पाठवली आहे. ही कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर 72 तासाच्या आत सर्व ट्विट डिलीट करण्याचा आणि बिनशर्त माफी (Apologies) मागण्याचा इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

हेही वाचा: वसई: बाप्पासोबत साडेपाच तोळ्याचा सोन्याच्या मूकूटाचे विसर्जन,पण...

परिवहन विभागातील बदली, पदोन्नती मध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनिल परब यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप वेळोवेळी सोमय्या यांच्याकडून करण्यात आले. दापोली इथ अनधिकृत रिसॉर्ट संदर्भात, कार्यालयासंदर्भात सोमय्या यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट टाकल्या. या नोटीसमध्ये या सर्वांचा उल्लेख करण्यात आला आहे. अनिल परब शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि संसदीय कार्यमंत्री पद आहे. अतिशय मेहनत करुन त्यांनी समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे. मात्र सोमय्या यांच्या निराधार आरोपामुळे आपल्या अशीलाची सार्वजनिक प्रतिमा डागाळत असल्याचा उल्लेख त्यांचे वकील सिंग यांनी या नोटीस मध्ये केला आहे.

सोमय्या यांचे आरोप तथ्यहीन असून, परब यांचा प्रत्यक्षात त्याच्याशी काही संबध नाही. त्यामुळे सोमय्या यांनी यापुढे असले आरोप करू नये, आरोपासंदर्भातील जुने ट्विट डिलीट करावे, माफी मागावी. माफीनामा मराठी, इंग्रजी किंवा हिंदी या भाषेतील किमान दोन वृत्तपत्रात प्रकाशित करावा अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. नोटीस मिळाल्याच्या 72 तासात नोटीसीतील मागण्या मान्य न केल्यास न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करु, असा इशारा सुषमा सिंग यांनी दिला आहे.

loading image
go to top