बापरे ! प्राण्यांमध्येही कोरोनाचा विषाणू? KEM रुग्णालयात मांजरांची स्वॅब टेस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cat

बापरे ! प्राण्यांमध्येही कोरोनाचा विषाणू? KEM रुग्णालयात मांजरांची स्वॅब टेस्ट

मुंबई : परदेशासह देशातही प्राण्यांना कोरोना संसर्गाची बाधा (Animal corona Infection) झाल्याचे समोर आले आहे. याचे प्रमाण कमी असले तरी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात ( kEM Hospital) नुकतीच दोन मांजरांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात जून महिन्यात दोन मांजरांच्या स्वॅबची (Cat Swab Test) तपासणी करण्यात आली आहे. यापूर्वीही मांजरांच्या स्वॅबचे चार नमुने केईएमच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तपासणीनंतर या प्राण्यांमध्ये कोरोना संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ( Animal corona swab test not infected declared by KEM Hospital Authority)

केईएम रुग्णालयात मोठी आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. अनेक तज्ज्ञ या प्रयोगशाळेत कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वाधिक कोरोना चाचण्या याच लॅब मध्ये केल्या जातात. त्यासह प्राण्याचे संशयित कोरोना स्वॅबदेखील याच लॅब मध्ये पाठवले जातात. कोरोनाकाळात 9 श्वानांचे स्वॅबही तपासण्यात आले असून आतापर्यंत 15 पेक्षा अधिक प्राण्यांचे स्वॅब इथे तपासण्यात आले आहेत. मात्र, एकाही स्वॅब चाचणीचा निकाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही.

हेही वाचा: शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज? संजय राऊतांनी दिलं उत्तर

आपल्या घरच्या पाळीव प्राण्यापासून किंवा एखाद्या वन्य प्राण्यापासून तर आपल्याला करोना होणार नाही ना, या भीतीने लोकांना ग्रासलेच आहे, परंतु आपल्या पाळलेल्या लाडक्या प्राण्याला करोनाची लागण झाली तर काय करायचे? या काळजीने ही प्राणिप्रेमींच्या मनात घर केल आहे. त्यातुनच अनेक प्राणीप्रेमी आपल्या आजारी प्राण्यांची चाचणी करून घेत आहेत. याशिवाय काही प्राण्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आम्ही ही काही श्वान आणि मांजरांचे स्वाब चाचणीसाठी पाठवले असल्याचे पशु वैद्यकीय महाविद्यालयातील सर्जन डॉ दिनेश लोखंडे यांनी सांगितले.

कोव्हीड-19'च्या संसर्गाच्या काळात माणसांइतकीच पाळीव प्राण्यांची काळजी घेणं क्रमप्राप्त आहे. पाळीव प्राण्यांनाही घरीच ठेवणं सध्याच्या परिस्थितीत योग्य आहे. पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन बाहेर जाणंही टाळायला हवं. कोव्हीडची लागण झालेल्या व्यक्तीने शक्यतो पाळीव प्राण्यांच्या जवळ जाऊ नये. कोव्हीड संसर्गाच्या काळात या सवयी त्या प्राण्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. पाळीव प्राण्याची काळजी घ्यायला घरी दुसरं कोणी नसेल, तर प्राण्याजवळ जाताना तोंडाला मास्क लावणं व प्राण्याजवळ जाण्यापूर्वी आणि नंतरही सॅनिटायझरने हात धुणे अत्यावश्यक आहे.

हेही वाचा: डेल्टा+च्या २१ रुग्णांपैकी किती जणांचं लसीकरण?

प्राण्यांमुळे 'कोव्हिड-19' माणसांमध्ये पसरल्याचे अद्याप आढळलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 'कोव्हिड-19' हा विषाणूजन्य रोग माणसाला घरात पाळल्या जाणार्‍या प्राण्यांपासून, शेतात पाळल्या जाणार्‍या घोडे-गायी-बैलांकडून किंवा कोंबडीच्या मांसातून होत नाही, असे पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अजित रानडे यांनी सांगितले आहे.

Web Title: Animal Corona Swab Test Not Infected Declared By Kem Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top