esakal | राणीच्या बागेतील 32 प्राण्यांचा मृत्यू; केंद्रीय प्राणीसंग्रहालयाचा अहवाल | Animal Death
sakal

बोलून बातमी शोधा

Ranichi-Baug

राणीच्या बागेतील 32 प्राण्यांचा मृत्यू; केंद्रीय प्राणीसंग्रहालयाचा अहवाल

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : सन 2019-20 या एका वर्षात वीर जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात (Zoo) तब्बल 32 विविध प्रकारच्या प्राण्यांचा मृत्यू (Animal deaths) झाला आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने आपल्या अहवालात (central report) ही नोंद केली आहे. राणीच्या बागेतील (Ranichi bagh) 2019-20 चा वार्षिक अहवाल केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने प्रसिद्ध केला. त्यात पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. त्यानुसार वर्षभरात 8 पक्षी,17 सस्तन प्राणी आणि 30 सरपटणाऱ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: जावेद अख्तर यांच्या विरोधातील दाव्याची कोर्टाने घेतली दखल

मृत झालेल्या सस्तन प्राण्यांमध्ये हरण, नीलगाय, सांबर, मॅकाक रीसस यांचा समावेश आहे. तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये 30 गोड्या पाण्यातील कासवांचा समावेश असून 8 विविध पक्षी मृत झाल्याचे अहवालात म्हटले आहे. सध्या राणीच्या बागेत 65 सस्तन ,34 सरपटणारे तर 173 प्रकारचे पक्षी शिल्लक आहेत. अहवालातील आकडेवारीनुसार बागेत एकूण 305 प्राणी होते, त्यातील 32 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. 272 प्राणी शिल्लक आहेत. 18 प्राण्यांचा बागेत जन्म झाला असून 22 प्राण्यांना रेस्क्यू करण्यात आले आहे.

loading image
go to top