esakal | जावेद अख्तर यांच्या विरोधातील दाव्याची कोर्टाने घेतली दखल | kangana Ranaut
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut-javed akhtar

जावेद अख्तर यांच्या विरोधातील दाव्याची कोर्टाने घेतली दखल

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने (kangana Ranaut) गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या विरोधात केलेल्या दाव्याची दखल मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने (court) घेतली असून अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. अख्तर यांनी कंगनाविरुध्द अबृ नुकसानीचा दावा (defamation) अंधेरी न्यायालयात दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत वांद्रे पोलिसांना (bandra police) चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा: आठ लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या नोकराला अटक

पोलिसांनी यावर फौजदारी फिर्याद दाखल करुन कंगनाला चौकशी साठी हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच अंधेरी न्यायालयाने देखील कंगनाला न्यायालयात सुनावणी साठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. कंगनाने सुनावणीला हजेरी लावली मात्र त्यानंतर तिने मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात स्वतंत्र दावा दाखल केला आणि संबंधित अंधेरी न्यायालयातील खटला अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली आहे. अंधेरी न्यायालयाने स्वतंत्रपणे या प्रकरणात चौकशी केली नाही तर वांद्रे पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश दिले, असा युक्तिवाद तिच्या वतीने करण्यात आला.

हेही वाचा: कॅन्सरवरील बनावट औषधांची विक्री; महिलेला अटक

मुख्य महानगर दंडाधिकारी एस टी दांडे यांच्यापुढे कंगनाच्या दाव्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. कंगनाने केलेल्या आरोपांवर दंडाधिकारींंची भूमिका प्रथम स्पष्ट व्हायला हवी, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. यावर पुढील सुनावणी ता. 18 रोजी होणार आहे. कंगनाने अंधेरी न्यायालयात सुनावणी साठी हजेरी लावली नव्हती त्यामुळे न्यायालयाने तिला हजर होण्यासाठी वेळोवेळी ताकिद दिली आणि वौरंट काढण्याचा इशाराही दिला होता. यामुळे या न्यायालयावर विश्वास नाही असे कंगनाच्या वतीने तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितले. त्यानंतर अंधेरी न्यायालयाने यावर पुढे सुनावणी घेतली नाही.

कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांच्याबाबत विधान केली आहेत. ही मुलाखत वायरल झाली असून त्याला लाखो हिटस मिळाल्या आहेत. मात्र संबंधित विधाने बोगस आणि आधारहिन असून यामध्ये तथ्य नाही असा आरोप अख्तर यांनी केला आहे आणि तिच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

loading image
go to top