esakal | "यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा", दमानिया यांचा खडसेंना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

"यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा", दमानिया यांचा खडसेंना इशारा

आज अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत खडसेंनी यापुढे कधीही आपलं नाव घेऊ नये अशी ताकीद खडसेंना दिली आहे. 

"यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा", दमानिया यांचा खडसेंना इशारा

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : उद्या एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. काल एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपण पक्ष का सोडत आहोत याचं कारण सांगितलं यावेळी त्यांनी अंजली दमानिया यांचं देखील खडसेंनी नाव घेतलं होतं.

त्यानंतर आज अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत खडसेंनी यापुढे कधीही आपलं नाव घेऊ नये अशी ताकीद खडसेंना दिली आहे. यापुढे खडसे यांनी आपलं नाव घेऊ नये असा इशारा देखील अंजली दमानिया यांनी खडसेंना पत्रकार परिषदेतून दिलाय. यावेळी अंजली दमानिया यांना अश्रू अनावर झालेलं होते. 

महत्त्वाची बातमी : हेलिकॉप्टरने खडसेंची मुंबईत एंट्री ! शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या होणार NCP प्रवेश

काय म्हणालात दमानिया ? 

एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांचं नाव घेत त्यांच्याबद्दलच्या केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला गेला. खडसेंच्या त्याच भाषेवर दमानिया यांनी आक्षेप घेतला होता. अंजली दमानिया म्हणाल्यात की, "एकनाथ खडसे यांच्यावर जो ५०९ चा गुन्हा दाखल केला गेला, जो एकनाथ खडसे खोटा आहे असं म्हणतायत. तो FIR आम्ही दोन दिवस ठिय्या दिल्यांनतर नोंदवला गेला. आणि हे एकनाथ खडसे पत्रकार परिषदेत म्हणतात की मी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि तो देखील तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून केला. एकनाथ खडसे यांनी घाणीचं राजकारण बंद करावं.  यापुढे माझं नाव कोणत्याही पत्रकार परिषदेत घेतलं तर याद राखा" असा इशारा दमानिया यांनी खडसेंना दिलाय.   

anjali damania to eknath khadase warns khase not to take her name ever

loading image
go to top