esakal | हेलिकॉप्टरने खडसेंची मुंबईत एंट्री ! शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या होणार NCP प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

हेलिकॉप्टरने खडसेंची मुंबईत एंट्री ! शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या होणार NCP प्रवेश

राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यासाठी उद्याचा मुहूर्त ठरलाय. अशात एकनाथ खडसे हे आज दुपारी आपल्या कुटुंबासह एका चार्टर्ड हेलिकॉप्टरने मुंबईत आलेत.

हेलिकॉप्टरने खडसेंची मुंबईत एंट्री ! शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या होणार NCP प्रवेश

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यासाठी उद्याचा मुहूर्त ठरलाय. अशात एकनाथ खडसे हे आज दुपारी आपल्या कुटुंबासह एका चार्टर्ड हेलिकॉप्टरने मुंबईत आलेत. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती मंदाकिनी खडसे, त्यांच्या कन्या ऍडव्होकेट रोहिणी खडसे आणि मदतनीस गोपाळ चौधरी हे मुंबईत आले आहेत. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा काल एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत असं खडसे म्हणाले होते.  

महत्त्वाची बातमी : मनोरंजन क्षेत्रबाबतचे धोरण लवकरच निश्चित करण्यात येणार - अमित देशमुख

उद्या मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनाथ खडसे यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी दोन वाजता मुंबईत खडसे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. एकनाथ खडसे मुंबईत येताना त्यांच्यासोबत कोण कोण मुंबईत येतं याकडे अनेक राजकीय विश्लेषकांचे लक्ष होतं. मात्र खडसें आपल्या सौभाग्यवती, सुकन्या आणि एक मदतनीस इतक्याच जणांसोबत खडसे मुंबईत आलेत .    

महत्त्वाची बातमी : राष्ट्रवादीकडून सत्तेचा गैरवापर; प्रशांत ठाकूर यांचा आरोप

एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईत आलेत. मुंबई येताना ते मुक्ताई साखर कारखान्याच्या मैदानातून निघालेत. यावेळी मोठ्या प्रमाणात खडसे समर्थकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळाली. खडसेंनी देखील यावेळी अनेकांची स्वतःहून चौकशी केली. एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे तर भाजपाची ताकद कमी होणार आहे असं राजकीय अभ्यासक म्हणतायत. 

eknath khadse reached mumbai by chartered helicopter all set to join NCP

loading image