रशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा; विधिमंडळाच्या दोन्ही प्रस्ताव संमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

रशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा; विधिमंडळाच्या दोन्ही प्रस्ताव संमत

मुंबई : स्टालिनग्राडचा पोवाडा लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यासाठी त्यांचा अर्धाकृती पुतळा रशियाच्या मॉस्को येथील मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर संस्थेच्या प्रांगणात बसविण्यात आला आहे. हा पुतळा बसविण्यात आल्याने त्या संस्थांच्या अभिनंदनाचा ठराव आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत करण्यात आला. विधानसभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर विधान परिषदेत सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हा अभिनंदनाचा ठराव मांडला, त्यावर दोन्ही सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून या ठरावाचे स्वागत केले.

2020 हे वर्ष अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यांचा रशियात अर्धाकृती पुतळा बसविणे ही बाब देशाची शान व मान वाढणारी आहे. त्यामुळे विधानपरिषद आणि विधानसभेत या संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला.

विधान परिषदेत शिक्षक आमदार नागो गाणार यांनी हा ठराव सभागृहात संमत करण्यासाठी सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पत्र देत त्यासाठी मागणी केली होती. तर विधानसभेत भोसरीचे आमदार महेश लांडगे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, अमरावतीचे आमदार रवी राणा, पुण्याचे आमदार सुनील कांबळे, उमरखेडचे आमदार नामदेव ससाने आदी आमदारांनी हा ठराव सभागृहात संमत करावा अशी मागणी विधानसभा अध्यक्षाकडे पत्र देऊन केली होती.

येथे उभारण्यात आला अर्धाकृती पुतळा...

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा कर्तत्वाचा आणि भारत रशिया संबंधांच्या संबंधांमध्ये दृढीकरणाच्या अनुषंगाने अण्णा भाऊ साठे यांनी केलेल्या महान कार्याचा सन्मान करण्यासाठी मास्को रशिया येथील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फोर फॉरेन लिटरेचर ( Maragarita Rodomino All Russia State Library for Foreign Literature) मॉस्को रशिया येथील जगप्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने यांचा अर्धाकृती पुतळा या संस्थेच्या जगप्रसिद्ध प्रांगणामध्ये उभारला आहे.

जगभरातील मान्यवरांची उपस्थिती..

मास्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींच्या सोबत उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण पुढील महिन्यात १४ सप्टेंबर रोजी सकाळी केले जाणार असून या कार्यक्रमासाठी केंद्रातील आणि राज्यातील काही मंत्री, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, भारतातील अनेक मान्यवर यासह जगभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे मास्कोमध्ये होऊ घातलेले हे अनावरण म्हणजे भारत देशाचा आणि महाराष्ट्राचा एक मोठा गौरव असल्याने त्यासाठी आज विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात अभिनंदन असा ठराव संमत करण्यात आल्याने या ठरावाचे राज्यातील साहित्यिक, विचारवंत आदींकडून स्वागत करण्यात आले आहे.

Web Title: Annabhau Sathe Russia Both Propositions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..