महत्वाची बातमी: एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 7 एप्रिल 2020

  • अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता जाहीर
  •  परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा

मुंबई : लॉकडाऊनमध्ये डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस आणि सरकारी कर्मचारी, अधिकारी यांच्यासह  एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांना दररोज 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अॅड अनिल परब यांनी जाहीर केले. 

लॉकडाऊन काळात मुंबईसारख्या महानगरांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची सेवा पुरविण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. त्यानुसार 23 मार्च पासून  मुंबई  व उपनगरातील विविध ठिकाणावरून एसटीच्या बसेद्वारे दररोज कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. कर्मचाऱ्यांना सध्या मास्क व सॅनिटायझर देण्यात येत आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

Announcement of incentive allowance for ST employees


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement of incentive allowance for ST employees