शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर!  आण्णासाहेब पठारे यांना जीवनगौरव

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या 2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात कुस्तीमहर्षी पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे यांना शिवछत्रपती जीवन गौरव राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.

मुंबई : राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या 2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात कुस्तीमहर्षी पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे यांना शिवछत्रपती जीवन गौरव राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. तर 5 जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 

कसाबच्या हातात हिंदूंचे पवित्र बंधन, राकेश मारियांचा खळबळजनक दावा

पुरस्कार विजेत्यांमध्ये युवराज खटके, सांगली (ऍथलेटिक्‍स), बाळासाहेब आवारे, बीड (कुस्ती), नितीन खत्री, पुणे (तायक्‍योंदो), जगदीश नानजकर, पुणे (खो-खो), अनिल बंडू पोवार, कोल्हापूर (पॅरा ऍथलेटिक्‍स) यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिला जाणार आहे. तर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची (खेळाडू गट) यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कबड्डी खेळात पुरुष गटातून रिशांक देवाडिगा आणि गिरीष इरनक तर महिला गटातून सोनाली शिंगटे हिला पुरस्कार जाहीर झाला आहे. कुस्ती खेळासाठीचा राज्य क्रीडा पुरस्कार अभिजित कटके याला दिला जाणार आहे. 
याशिवाय साहसी गटात चौघांना राज्य क्रीडा पुरस्कार मिळणार आहे. यात खाडी पोहणे यासाठी प्रभात कोळी आणि शुभम वनमाली यांना पुरस्कार दिला जाणार आहे. तर गिर्यारोहणासाठी अपर्णा प्रभूदेसाई आणि सागर बडवे यांना राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तर स्वप्निल पाटील (जलतरण), पार्थ हेंद्रे (जलतरण), सायली पोहरे (जलतरण) या तिघांना दिव्यांग खेळाडू गटातील राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर जयदीपकुमार सिंह याला ज्युदो आणि वैष्णवी सुतार हिला टेबल टेनिस खेळासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: announces of shivchatrapati krida purskar

टॉपिकस
Topic Tags: