esakal | "कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

"कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

"कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : २६ नोव्हेंबेर २००८ ला मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात पकडला ल्या गेलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्याबद्दल मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकातून मोठा खुलासा केला आहे. जर कसाबला घटनास्थळीच मारून टाकण्यात आलं असतं तर या हल्ल्याला संपूर्ण जगाने आज 'हिंदू आंतकवाद' म्हणून मानलं असतं असं राकेश मारिया यांनी म्हंटल आहे.

मोठी बातमी - शीना बोरा हत्या प्रकरण: माजी पोलिस आयुक्तांचा 'मोठा' गौप्यस्फोट.. 

कसाबचे हिंदू ओळखपत्र :

२६/११ चा हल्ल्याचं प्लॅनिंग अगदी बारकाई आणि तीक्ष्ण डोक्याने करण्यात आलं होतं. कुख्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाने या हल्ल्याला संपूर्णपणे हिंदू आंतकवादाचे स्वरूप द्यायचे ठरवलं होतं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे कसाब याच्या मनगटाला हिंदू बांधतात तसंच पवित्र बंधन बांधण्यात आलं होतं. त्याची ओळख बदलून त्याचं ओळखपत्र समीर दिनेश चौधरी असं तयार करण्यात आलं होतं. यावर त्याचा पत्ता बंगळुरू इथला टाकण्यात आला होता. जर कसाबला घटनास्थळीच मारून टाकण्यात आलं असतं तर या हल्ल्याला संपूर्ण जगाने आज 'हिंदू आंतकवाद' म्हणून मानलं असतं असं राकेश मारिया यांनी म्हंटल आहे.

मोठी बातमी - पाण्याची बाटली सोबत ठेवा, टोपी घाला, गॉगल लावा.. कारण मुंबई पेटलीये !

दाऊद इब्राहीमला मिळाली होती कसाबची सुपारी:

राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे २६/११ च्या हल्ल्याचे कनेक्शन दाऊद इब्राहीमसोबतही होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि जैश यांना कसाबला संपवयाचे होतं. कारण कसाबतर्फे महत्वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता होती. म्हणून दाऊद इब्राहीमला कसाबची सुपारी देण्यात आली होती. मात्र कसाबला जीवंत ठेवणं महत्वाचं होतं कारण त्याच्याकडून माहिती मिळवायची होती. पोलिसांना जनतेच्या मनातला कसाबबद्दलचा रोष सहन करावा लागत होता. दरम्यान कसाबचा फोटो केंद्रीय संस्थांकडून माध्यमांवर टाकण्यात आला होता असंही राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात म्हंटल आहे.

मोठी बातमी - उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज

या संपूर्ण हल्ल्याला हिंदू आतंकवादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मोठा खुलासा राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय.   

rakesh maria revealed major truth about mumbai 26 11 terror attack and kasab   

loading image
go to top