धक्कादायक ! तिनं इथे जुगार खेळू नका असं दरडावून सांगितलं खरं, पण झालं उलटंच काही...

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

इमारतीच्या आवारात इमारतीतील व्यक्तीसह बाहेरच्या नागरिकांना जुगार खेळण्यास मज्जाव केल्याने परिचारिका व तिच्या पतीला मारहाण केल्याची बाब परिचारिका दिनी समोर आली आहे

ठाणे : इमारतीच्या आवारात इमारतीतील व्यक्तीसह बाहेरच्या नागरिकांना जुगार खेळण्यास मज्जाव केल्याने परिचारिका व तिच्या पतीला मारहाण केल्याची बाब परिचारिका दिनी समोर आली आहे. कोरोना या विषाणूशी मुकाबला करण्यात डॉक्टर आणि परिचारिका आपल्या जीवाची बाजी लावत असताना  जगतिक परिचरिका दिनीच ही घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

गावी जायंचय मग, 'ई-पास' मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा रेल्वे स्थानकाजवळील चिंचपाडा परिसरात एका इमारतीच्या आवारात मागील बाजूस तळ मजल्यावर राहणारी व्यक्ती त्यांच्या बाहेरील मित्रांना व इतरांना घेऊन त्या ठिकाणी जुगार खेळत होते. कोरोनाचा भीतीमुळे व सोसायटीत राहणाऱ्या परिचारिका संगीता (स्वरा) काटे यांनी त्यांच्या मेडिकलच्या अनुभवातून त्यांना या ठिकाणी बाहेरील व्यक्तींना प्रवेश न देण्याची व जुगार खेळू नये अशी विनंती केली. तसेच त्यांच्या बाजूच्या इमारतीत काही मुले अमली पदार्थांची विक्री करीत असतात. त्यामुळे या दोन्ही सोसायट्यांच्या आवारात बाहेरील नागरिकांचा वाढता वावर कोरोनाला आमंत्रण देण्याचे कारण बनू शकेल, या भावनेतून संगीता यांनी या सर्व बाबींना मज्जाव केला. 

मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

या गोष्टीचा राग मनात धरून त्या व्यक्तीने व त्याच्या कुटुंबातील महिलांनी मिळून परिचारिका संगीता व त्यांचे पती अर्जुन काटे या दोघांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात संगीता काटे यांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र, न्याय मिळाल नसल्याची माहिती काटे यांनी दिली. या सर्व प्रकारामुळे मानसिक कुचंबना होत असल्याची भावना काटे यांनी व्यक्त केली. 

     राहत्या घराच्या आवारात बाहेरील व्यक्तींना घेऊन जुगार खेळण्यात येत होता. त्यास मज्जाव केल्यामुळे राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीने मला व माझ्या पतीला मारहाण केली. तसेच या बाबत पोलिसात तक्रार दाखल करून पाच ते सहा दिवस उलटूनही न्याय मिळला नाही. 
 - संगीता (स्वरा) अर्जुन काटे, परिचारिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annoying! Nurse beaten for gambling; The matter was revealed on World Nurses Day