esakal | मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप आता इ टोकन सुविधा उलब्ध केली आहे.

मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप आता इ टोकन सुविधा उलब्ध केली आहे. ही सुविधा http://www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. हा प्रयोग सुरुवातीला पुण्यात करण्यात आला असून मुंबई मध्येही हा प्रयोग सुरू होण्याची शक्यता आहे. 

सामनातून सरकारला थेट 'हा' सवाल, जनतेचा धीर सुटणार नाही याचीही काळजी घेण्याचा सल्ला

आता ग्राहकांना मद्य खरेदी करण्यासाठी लाईन लावण्याची गरज पडणार नाही. ज्या ग्राहकांना मद्य खरेदी करायचे आहे अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून इ-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. 

साधारणतः असा असेल लॉकडाऊन 4 चा टप्पा, जाणून घ्या नवा फॉर्म्युला...

त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणा-या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. सदर पैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास इ – टोकन मिळेल. सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोयीच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.

e token for the sale of liquor decision by state excise department of maharashtra

loading image