धक्कादायक ! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

ठाण्यात राहणारे आणि दादर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हे पोलिस हवालदार वरळी कोळीवाडा येथे मोबाईल व्हॅनवर तैनात होते. 20 मे रोजी थंडीताप आल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

मुंबई : मुंबईतील 54 वर्षीय पोलिस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईतील आहेत. आतापर्यंत राज्यातील 20 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नक्की वाचा : हृदयद्रावक! उपाशी राहून केला ६० तासांचा प्रवास, अखेर भुकेमुळे निधन; श्रमिक ट्रेनमधलं दुर्दैवी वास्तव..  

ठाण्यात राहणारे आणि दादर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हे पोलिस हवालदार वरळी कोळीवाडा येथे मोबाईल व्हॅनवर तैनात होते. 20 मे रोजी थंडीताप आल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. 22 मे रोजी आलेल्या अहवालात त्यांना कोरोना झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांना मरोळ येथील पीटीएस विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना वरळीतील एनएससीआय केंद्रात हलवण्यात आले. परंतु, 24 मे रोजी त्यांची प्रकृती खालावली आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना आग्रीपाडा येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोठी बातमी : शाळा सुरु झाल्यानंतर काय? मुख्यमंत्र्यांनी दिल्यात 'या' महत्त्वाच्या सुचना...

प्रकृती आणखी गंभीर झाल्यामुळे त्यांना 26 मे रोजी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1052 वर पोहोचला आहे. राज्यातील 20 पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात223 पोलिस अधिकारी आणि 1741 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Another police officer died of corona, read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another police officer died of corona, read full story