सीआरपीएफचे 'ते' जवान कोरोनाच्या लढ्यात देणार आणखी एक 'उल्लेखनीय' योगदान, नक्की वाचा

CRPF
CRPF

मुंबई : शहरात प्रतिकुल परिस्थिती असल्यावर अनेक निमलष्करी दलांची
मदत घेतली जाते. आता कोरोनाचा रुग्णांना बरे करण्यासाठी आवश्यक असलेला प्लाज्मा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील जवान दान करणार आहेत. त्याबाबत आता दलातील आधिकाऱ्यांची रुग्णालयासह चर्चा सुरु आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान प्रामुख्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असतात. त्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. दलाच्या दिल्ली विभागातील जवानांना यापूर्वीच प्लाज्मा दान करण्यास सुरुवात केली आहे. आता मुंबई विभागातील जवानही चार ते पाच दिवलात प्लाज्मा दान करण्यास सुरुवात करणार आहेत. 

मुंबईत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील 90 जवानांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील 78 जण बरे झाले आहेत, तर बारा जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. या दलाच्या मुंबई विभागात एकंदर साडेचार  हजार जवान कार्यरत आहेत. लोकांना सुरक्षित ठेवणे हेच आमचे काम आहे. आता त्यामुळे प्लाज्मा आम्ही दान करुन लोकांना वाचवण्याचेच काम करीत आहोत, या दलातील जवानांनी सांगितले. रुग्णालयासह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील आधिकाऱ्यांची चर्चा सुरु आहे. प्लाज्मा थेरपीसाठी प्लाज्मा देण्याची तयारी आहे. विमानतळावरील सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर असते. त्याद्वारे लोकांचे संरक्षण करीत असतो. आता कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी प्लाज्मा देणार आहोत, असे या दलातील आधिकाऱ्यांनी सांगितले. 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने आपल्या प्रत्येक जवानास एन 95 मास्क दिला आहे. तसेच हँड सॅनिटायझर्स, ग्लोव्हज, फेस शिल्डही दिल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षित अंतर राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानंतरही कोरोनाची बाधा झालेले जवान आता बरे झाले आहेत. उपचार सुरु असलेल्या बारा जवानांचीही प्रकृतीही स्थिर आहे. कोरोनातून बरे झालेल्या जवानांसह आम्ही प्लाज्मा देण्याबाबत चर्चा केली आहे. त्याबाबत आवाहन केले आहे. आम्ही तयारी दाखवलेल्या जवानांची माहीती रुग्णालयास 
देणार आहोत, असे सुरक्षा दलातील आधिकाऱ्यांनी सांगितले.

Another remarkable contribution the CRPF jawans will make to Corona fight

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com