दबंग सलमानच्या नावाने कास्टींग फसवणूक, अभिनेत्याची पोलिसांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

अभिनेता अंश अरोराची याला बनावट ईमेल व दूरध्वनी पाठवून  टायगर झिंदा है 3 मध्ये प्रमुख खलनायकाच्या भूमिका देण्याची ऑफर देण्यात आली होती.

मुंबई : अभिनेता अंश अरोराची याला बनावट ईमेल व दूरध्वनी पाठवून  टायगर झिंदा है 3 मध्ये प्रमुख खलनायकाच्या भूमिका देण्याची ऑफर देण्यात आली होती. पण हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती अभिनेता सलमान खानला मिळाल्यानंतर त्याने ट्वीट करून अशा कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग सुरू नसल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणानंतर अंशने ओशिवरा पोलिस ठाण्यात ईमेल पाठवणा-या व्यक्तींविरोधात तक्रार केली आहे.

Big News - क्या बात हैं ! प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी, नायरमधील रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

क्वींस है हम व तनहाईया सारख्या मालिकांमुळे प्रसिद्ध झोतात आलेल्या अंशला सलमान खान प्रोडक्शन हाऊसच्या नावाने श्रृती नावाच्या महिलेने संपर्क साधला. ईमेल व दूरध्वनीद्वारे संबंधीत व्यक्तीने टायगर झिंदा है 3 या चित्रपटातील प्रमुख खलनायकाच्या भूमिकेसाठी अंशची निवड झाल्याचे सांगितले. 3 मार्चला या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभू देवा स्वतः अंशचे ऑडिशन घेणार होते, अशा ईमेलही अंशला आला होता. पण काी कारणामुळे ते व्यस्त असल्यामुळे ही ऑडीशन रद्द करण्यात आली. पण त्याचे व्हिडिओ व छायाचित्र पाहून  अंशला खलनायकाच्या भूमिकेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले असून याबाबतची बैठक काही दिवसानंतर आयोजीत करण्यात आली असल्याचेही अंशला सांगण्यात आले. तसेच या चित्रपटासाठी त्याची ट्रेनिंग पुढच्या महिन्यापासन सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?

पण चार दिवसांपूर्वीच सलमान खानने ट्वीटरवर एक स्टेटमेंट जारी करून आपली प्रोडक्शन कंपनी कोणत्याही प्रकारचे कास्टींग सध्या करत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. नवीन कास्टींग करण्यासाटी आम्ही कोणत्याही कास्टींग एजंटला सांगितले नसून अशा संबंधीत ई-मेल अथवा दूरध्वनी आपल्याला आले असतील, तर त्याच्यावर विश्वास ठेऊ नका. जो असा प्रकारची अफवा पसरवत आहे, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही सलमानने स्पष्ट केले. ही स्टेटमेंट पाहिल्यानंतर अंशला आपली फसणूक झाल्याचे स्पष्ट झाले. अखेर त्याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ansh arora files complaint against fake agency for offering role in tiger zinda hain