अँटिलिया स्फोटक प्रकरण : आरोपी नरेश गोरला याला सशर्त जामीन मंजूर | Antilia explosive case update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

antilia explosive case

अँटिलिया स्फोटक प्रकरण : आरोपी नरेश गोरला याला सशर्त जामीन मंजूर

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणातील (Antilia explosives case) आरोपी क्रिकेट बुकी नरेश गोरला (Naresh Gorala) आज विशेष न्यायालयाने (Special court) सशर्त जामीन मंजूर (Bail granted) केला. या प्रकरणात मिळालेला हा पहिला जामीन (First bail in this case) आहे. वकील अनिकेत निकम (Advocate Aniket nikam) यांच्यामार्फत गोरने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. बडतर्फ पोलीस निरीक्षक सचीन वाझेला (Sachin Waze) सिम कार्ड पुरवले, असा आरोप गोरवर एनआयएने (NIA) ठेवला आहे.

हेही वाचा: केंद्र सरकार स्वच्छ सर्वेक्षण 2021; मोठ्या शहरांमध्ये मुंबई अव्वल

माझा कोणत्याही गुन्ह्यात संबंध नाही आणि कोणत्याही कटकारस्थानात मी सहभागी नाही, असा दावा त्याने अर्जामध्ये केला होता. मी वाझेला सीम कार्ड दिली असली तरी मी त्याला कधीही भेटलो नाही आणि फोनही केले नाही. त्यापुढे माझा यामध्ये कोणताही संबंध नाही. केवळ आधारहिन शक्यता ग्रुहित धरून मला आरोपी करण्यात आले आहे असा युक्तिवाद त्याच्या वतीने निकम यांनी केला.

गोरला मनसुख हिरन हत्या प्रकरणातही गोरला आरोपी करण्यात आले आहे. मात्र हिरनला तो ओळखत नाही आणि कधीही त्याला भेटलो नाही, आणि त्याच्या विरोधात कोणते पुरावे देखील नाहीत, त्यामुळे कोणत्याही कटकारस्थानात त्याचा सहभाग नाही, असे निकम यांनी सांगितले. विशेष न्या ए टी वानखेडे यांनी शनिवारी गोरला सशर्त जामीन मंजूर केला. एनआयएने त्याच्यावर सीम कार्ड पुरविणे आणि कारस्थान करणे असे आरोप ठेवले आहेत. या प्रकरणात गोर हा जामिन मिळालेला पहिला आरोपी आहे. वाझे दोन्ही प्रकरणात प्रमुख आरोपी आहे.

loading image
go to top