Mumbai News: संसर्ग नियंत्रणासाठी प्रयोग! पालिका रुग्णालयांत ‘सूक्ष्मजंतूनाशक बेड मॅट’ वापरण्याबाबत चर्चा

Government Hospital: मुंबईतील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सूक्ष्मजंतूनाशक बेड मॅट वापरण्याबाबत चर्चा सुरू केल्या आहेत. यामुळे रुग्णांना होणारा संसर्ग रोखण्यासाठी मदत मिळणार आहे.
Government Hospital

Antimicrobial bed mats use in Government Hospital

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांना होणारा संसर्ग रोखण्यासाठी ‘सूक्ष्मजंतूनाशक बेड मॅट’ वापरण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या मॅटवर असलेले सूक्ष्मजंतूनाशक कोटिंग जंतूंची वाढ रोखण्यास मदत करते. तसेच, जलप्रतिबंधक थरामुळे रक्त, लघवी, घाम, स्त्राव यांसारखे संसर्गाचे प्रमुख वाहक थेट गादीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे या मॅटबाबत विचारणा सुरू असून, त्यांचा खर्च, परिणामकारकता आणि अंमलबजावणी याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com