esakal | "आता काहीही झालं तरी काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू होणार नाही", काश्मीर मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

"आता काहीही झालं तरी काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू होणार नाही", काश्मीर मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा

"आता काहीही झालं तरी काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू होणार नाही. पुन्हा जर कोणीही हे कलम लावण्याचा प्रयत्न केला तर जनता माफ करणार नाही", असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणालेत. 

"आता काहीही झालं तरी काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू होणार नाही", काश्मीर मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्ष आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून काँग्रेसला धारेवर धरलं. आता काहीही झालं तरी काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू होणार नाही. पुन्हा जर कोणीही हे कलम लावण्याचा प्रयत्न केला तर जनता माफ करणार नाही, असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणालेत. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले, आता जम्मू काश्मीरमधील जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आले आहे. तिथे कोणताही भारतीय गुंतवणूक करू शकतो, पायाभूत सुविधा कामे सुरू झाली आहेत. असे असताना भारत विरोधी शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांशी हातमिळवणी करून 370 कलम पुन्हा लागू करण्याबाबत हालचाली करत आहे. गुपकर आघाडीअंतर्गत काश्मीरमधील अनेक पक्ष एकत्र आले आहेत, यामध्ये काँग्रेस सहभागी झाले आहे असं फडणवीस म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी शिवसेनेचा सर्वात मोठा गड हिसकवण्यासाठी भाजपचं 'मिशन मुंबई'

एकीकडे फारुख अब्दुल्ला हे चीनच्या मदतीने 370 कलम लागू करावे अशी भाषा करत आहेत, तर दुसरीकडे मेहबुबा मुफ्ती म्हणतात काश्मीरचा झेंडा लागला नाही तर राष्ट्रीय ध्वजाची मोडतोड करू अशी वक्तव्य करत आहेत. अशात काँग्रेसला गुपकर आघाडीचा अजेंडा मान्य आहे का ? असा सवाल यावेळी फडणवीसांनी काँग्रेसला विचारला. त्यामुळे देशविरोधी शक्तींसोबत काँग्रेस उभा असेल तर आम्ही रोज काँग्रेसला प्रश्न विचारू, काँग्रेसला उघडं पाडण्याचे काम करू असं देखील फडणवीस म्हणालेत.  

पत्रकार परिषदेत या विषयावर बोलताना फडणवीस म्हणालेत की, आता काहीही झालं तरी 370 कलम पुन्हा लागू होणार नाही हे आम्ही काँग्रेससहित गुपकर आघाडीला आम्ही सांगू इच्छितो. 

( संपादन - सुमित बागुल )

at any cost now article 370 will not be implemented in kashmir fadanavis targets congress

loading image